मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मामुर्डी शाळेची भरारी तालुक्यात द्वितीय क्रमांक.

 मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत मामुर्डी शाळेची भरारी तालुक्यात द्वितीय क्रमांक.

-------------------------------- 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा प्रतिनिधी 

-------------------------------- 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत जावळी तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी या शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला आहे प्रथम क्रमांक ओझरे शाळा, द्वितीय क्रमांक मामुर्डी आणि तृतीय क्रमांक दुर्गम अशा भागातील एकीव शाळेला मिळाला आहे सदर स्पर्धे साठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा , आरोग्य , आदि बाबींचे निकष लावणेत आले होते. स्पर्धेच्या अगोदर पासुनच मामुर्डी शाळा तयार होती तरीही मामुर्डी गावातील श्री केदारेश्वर विकास मंडळ, ग्रामस्थ यांनी अवघ्या पंधरा दिवसात शाळा श्रमदान, शैक्षणिक उठावामुळे स्पर्धेत प्रथम क्रमांक येईल या ध्येयाने चांगला प्रयत्न केला होता. 

तालुका मूल्यांकन कमिटीने परीक्षण करून मामुर्डी या शाळेला जावळी तालुक्यात द्वितीय क्रमांक जाहीर केला .या स्पर्धेसाठी शाळेचे व्यवस्थापन समितीचे आजी /माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, समिती सदस्य, ग्रामस्थ,सर्व शिक्षक यांनी चांगल्याप्रकारे तयारी केली होती तसे परिश्रमही घेतले होते परंतु मामुर्डी ला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत दुसरा क्रमांक आले बद्दल सरपंच जगन्नाथ धनावडे ,मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र धनावडे नविमुंबई महानगर पालीकेचे अधिकारी विष्णू आप्पा धनावडे जावली बँकेचे संचालक विश्वनाथ धनावडे व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय धनावडे , उपाध्यक्ष बजरंग चौधरी , माजी अध्यक्ष सुनील धनावडे ग्रामपंचायत सदस्य बाजीराव धनावडे वसंत मोरे सविता धनावडे सुषमा धनावडे लक्ष्मी जाधव रंजना धनावडे , ग्रामपंचायत मामुर्डीचे सर्व माजी सरपंच, श्री केदारेश्वर विकास मंडळ, श्री केदारेश्वर भजन मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब, महिला मंडळ, तसेच पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमींनी अभिनंदन केले

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.