डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते लोणी फाटा या कामात हलगर्जीपणा.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते लोणी फाटा या कामात हलगर्जीपणा.
--------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-------------------------
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला रस्ता मालपणी या ठेकेदाराने एका महिन्यापासून खदुन ठेवला व रस्त्याचे काम कासव गतीने चालू आहे. हा रस्ता मुख्य बाजारपेठेमध्ये आहे, या रस्त्याच्या दोन्ही कडेला दुकाने आहेत. तसेच नगरपरिषद गाळे आहेत भाजी मंडी आहे, जीवन आवश्यक वस्तूंच्या दुकान आहेत. हा रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात ये जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. व दुकानांमध्ये धूळ उडत आहे. या रोडवर माती मिश्रित मुरूम टाकण्यात आले. या रोडवर कोणत्या प्रकारची दबाई किंवा पाणी टाकण्यात येत नाही. पाणी टाकले तर थातुर मातुर पाणी टाकत येत.आहे आजूबाजूच्या दुकानदारांच्या दुकानात धुळ उडत असल्यामुळे दुकानदार त्रस्त झालेले आहेत, हे काम लवकरात लवकर करण्याची मागणी व्यापाऱ्यांरी वर्गाकडून होत आहे. मात्र हा ठेकेदार उटावरूनतर घोडे राखत आहे. हा ठेकेदार कशा पद्धतीने काम चालू आहे हे सुद्धा पाहण्याकरिता आला नाही.
व्यापारी वर्गाकडून मागील कित्येक वर्षापासून हा रस्ता करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. हा रस्ता चालू झाला मात्र या रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असल्याने ठेकेदाराच्या हलगदी पणामुळे व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कासवगतीने काम चालू केल्यामत्यामुळे मुख्याधिकारी यांना नगरसेविका मीरा संतोष च-हाटे यांनी तक्रार देऊन नगरपरिषदेने जो इस्टिमेट तयार केला होता, त्या इस्टिमेटच्या हिशोबाने काम लवकरात लवकर करावे व कामात कोणतेही हलगर्जीपणा करू नये व नागरिकांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, याकरिता तक्रार सुद्धा देण्यात आली आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करावी व संबंधित ठेकेदार मालपाणी याला लवकर काम चालू करण्याकरिता आदेश द्यावा व बांधकाम विभागाने इस्टिमेटच्या हिशोबाने काम करून घ्यावे व इस्टिमेट मध्ये जे काम आहे, त्या पद्धतीने काम करावे. इस्टिमेटमध्ये शितलादेवी ते लोणी फाटा असे असून ते काम त्या पद्धतीने करावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली. जर हे रोड एका साईडने चालू केले कोणालाही त्रास होणार नाही व रहदारी सुद्धा एका साईडने चालू राहील पण असे होत नाही. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने हा रोड दोन्ही साईटने खोदून टाकला आहे.
प्रतिक्रिया.
सौ मीरा संतोष चराटे नगरसेविका प्रभाग 06
शितला देवी ते लोणी फाटा हा रोड माझ्या प्रभागात येत आहे. त्यामुळे वारंवार ठेकेदारांना सांगून सुद्धा ठेकेदार मनमानी कारभार करतो ,व त्यामुळे नागरिकांना व दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे. या रोड चे एक साईटने काम चालू करावे व इस्टिमेट मध्ये ज्या पद्धतीने दिलेल आहे त्या पद्धतीने काम करावे कामात कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये व निकृष्ट दर्जाचे काम करू नये याची पाहणी व दखल बांधकाम विभागाने घ्यावी. बांधकाम विभागाने या रोडचे काम चालू असताना लक्ष देण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. मुख्याधिकारी यांना काम चुकीच्या पद्धतीने व कासव गतीने चालू आहे याची तक्रार सुद्धा देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment