Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पुणे विभागात घरकुल योजनेत जावली विकास गट सर्वात्कृष्ट पुरस्कारांने सन्मानित.

 पुणे विभागात घरकुल योजनेत जावली विकास गट सर्वात्कृष्ट पुरस्कारांने सन्मानित.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधी

 शेखर जाधव

----------------------------

भणंग :- शासनाने राज्यात "अमृत महा आवास अभियान ग्रामीण " सुरु केलेले आहे. त्यानुसार अभियान कालावधीत उत्कृष्ट काम करणा-या संस्था/ व्यक्तींना "अमृत महा आवास अभियान ग्रामीण" पुरस्कार देणे बाबत शासनाने सूचित केलेले आहे. त्यानुसार विभागस्तरावर वितरीत करावयाच्या पुरस्काराचे बाबत विभागस्तरीय अंमलबजावणी, सनियंत्रण व मूल्यमापन समितीची सभा दि.२३-०२-२०२४ रोजी संपन्न झाली. सदर सभेमध्ये पुणे विभागातून विभागस्तरावर जावली विकास गटाचे गट विकास अधिकारी मा.श्री.मनोज भोसले साहेब यांची नामांकना व्दारे निवड झालेचे शासनाने घोषित केले आहे.प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण करिता सर्वोत्कृष्ट तालुक्यामध्ये पुणे विभागामध्ये जावली (सातारा) विकास गटाला मानांकन प्राप्त झालेले आहे अमृत महाराज अभियान ग्रामीण पुरस्कार सोहळ्याकरिता शासनाने जावलीचे गट विकास अधिकारी मा.श्री.मनोज भोसले निमंत्रित केले होते अमृत महा आवास अभियान ग्रामीण विभाग स्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक १ मार्च 2024 विभागीय आयुक्त कार्यालय विकास शाखा पुणे विभाग पुणे विधान भवन कौन्सिल हॉल कॅम्प एरिया पुणे या ठिकाणी पार पडला दिनांक १ मार्च 2024 रोजी पुणे येथे शानदार सोहळ्यामध्ये जावली गविअ श्री.मनोज भोसले यांचा शासनाच्या वतीने सन्मानपत्र व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे शासनाने घरकुल डाटा एन्ट्री ऑपरेटर श्री.अमर मर्ढेकर यांना देखील सदर पुरस्कार वितरण सोहळ्याला निमंत्रित केले होते घरकुल योजनेत जावली तालुक्याचा पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळे तालुक्यामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे पुणे विभागात प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर सदर यश हे श्री अमर मर्ढेकर घरकुल डाटा एन्ट्री ऑपरेटर ,श्री.दळवी तांत्रिक सहाय्यक (घरकुल )श्री.सुहास काकडे मनरेगा डाटा एन्ट्री ऑपरेटर ,श्री देवेंद्र लखापति तांत्रिक सहाय्यक (मनरेगा), श्री.अभिजीत जाधव , तांत्रिक सहाय्यक (मनरेगा) सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी श्री. राऊत ,ग्रामपचांयत विभागाचे विस्तार अधिकारी श्री.दिगंबर सुरवसे , श्री .वसंत धनावडे ,श्री.अमित पवेकर ,श्री. देशमुख त्याचबरोबर सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री.कैलास गायकवाड ,ग्रामपंचायत विभागाचे कनिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री.संजय नारकर व श्री.सुनिल उबाळे विकास गटातील सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक , तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी ,घरकुल लाभार्थी यांच्यामुळे मिळालेचे गविअ श्री .मनोज भोसले यांनी याबाबतची अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. सदर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पुणे विभागाचे विभागीय आयुक्त मा. श्री.चंद्रकांत पुलकुंडवार (भाप्रसे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्रीमती.याशनी नागराजन (भाप्रसे) ,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मा.श्री.संतोष हराळे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री महादेव घुले ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)मा.श्रीमती अर्चना वाघमळे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) मा.श्री.निलेश घुले ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पापु व स्व.वि) मा.श्रीमती क्रांति बोराटे या सर्वांनी गटविकास अधिकारी माननीय श्री मनोज भोसले साहेबांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments