अधिकाऱ्यांचा आशीर्वाद: प्रशासन सुस्त,गांधीनगरमध्ये गुटखा विक्री जोमात.
अधिकाऱ्यांचा आशीर्वाद: प्रशासन सुस्त,गांधीनगरमध्ये गुटखा विक्री जोमात.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
--------------------------------
गांधीनगर :- गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसगडे, न्यू वाडदे, सरनोबतवाडी, उंचगाव, गडमुडशींगी, चिचंवाड, वळीवडे ही गावे येतात. या गावांमध्ये जवळपास 300 ते 400 पानपट्टी मधून गुटखा विकला जात आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.
महाराष्ट्र सरकारने गुटखाबंदी लागू केली असली तरी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गुटखाबंदी लागू झाली नाही, असे चित्र स्पष्ट दिसत आहे.कारण या पानपट्टी मधून महिना 400 रुपये प्रमाणे गुटखा विक्रीसाठी अलिखित परवानगी दिली असल्यामुळे गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमधून खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे.
या पानपट्टीमधून खुद्द गुटखा विक्रेता दरमहा 400 रु प्रमाणे वसुली करुन अलिखित आदेश देणाऱ्या अधिकारी यांना ती रक्कम पोच केली जाते.
----------------------------------------
Comments
Post a Comment