Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नागाव येथे धैर्यशील माने यांची प्रचार रॅली.

 नागाव येथे धैर्यशील माने यांची प्रचार रॅली.

--------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

---------------------------- 

नागाव,ता.हातकणंगले येथे आज सोमवार दि.22 रोजी सायंकाळी 5 वाजता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्ष शिंदे गटाचेअधिकृत उमेदवार धैर्यशील माने (दादा) यांच्या  प्रचारार्थ  दु चाकी वरून प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ठीक 5 वाजता ग्रामदैवत श्री खणाई देवी चे दर्शन घेण्यात आले.त्याचबरोबर समतानगर येथील विहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.त्याचबरोबर ठिकठिकाणी महिलांनी धैर्यशील माने याचे औक्षण केले.संपूर्ण गावातून  फेरी मारून  या फेरीची सांगता नागाव फाटा येथे करणेत आली.

       यावेळी दु चाकी रॅली चे सांगता प्रसंगी उमेदवार धैर्यशील माने यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले की मागील निवडणुकीत जसे आपण माझ्यामागे ठाम राहिला तसे यावेळी ही आपण सर्वजण पाठीशी राहावे,असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

     यावेळी नागाव चे माजी लोकनियुक्त सरपंचयांनी  गेल्यावेळच्या निवडणूकितील मताधिक्य पेक्षा जास्त मताधिक्य यावेळी देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

    श्री किरण मिठारी, गणपती माळी, प्रकाश पोवार,अरुण हराळे, धनाजी घाटगे,ग्रामपंचायत सदस्या अश्विनी पाटील,मनीषा पाथरे,ग्रामपंचायत सदस्य सागर गुडाळे,जयसिंग यादव, शिवरुद्र हिरेमठ , तात्यासो चव्हाण यांच्यासह भाजप,शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments