के.जे. पाटील यांच्या 'काळजातला गाव' या कवितासंग्रहाचे प्रकाशन
के.जे. पाटील यांच्या 'काळजातला गाव' या कवितासंग्रहाचे प्रकाशन.
-----------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------------
कालकुंद्री (ता. चंदगड) गावचे कथालेखक, कादंबरीकार के.जे. पाटील यांच्या 'काळजातला गाव' या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
भिमक्रांती सांस्कृतिक युवा मंच कालकुंद्री यांनी आयोजित केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यान, बक्षीस वितरण व सत्कार समारंभात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे व्याख्याते प्राध्यापक डॉ. मधुकर जाधव यांच्या हस्ते के.जे. पाटील यांच्या 'काळजातला गाव' या कवितासंग्रहचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी प्रा. विनायक कांबळे सरांनी 'काळजातला गाव' या कवितेचे कवितावाचन केले .त्या कवितेला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. आतापर्यंत के.जे. पाटील यांचे चार कथासंग्रह व एक कादंबरी प्रकाशित झाली आहे.
या प्रकाशन सोहळ्याला गावच्या सरपंच छाया राजाराम जोशी, कलमेश्वर सेवा सोसायटीचे चेअरमन अशोक रामू पाटील , सामाजिक कार्यकर्ते एम.जे. पाटील, माजी सरपंच दयानंद कांबळे, माजी सरपंच विनायक कांबळे, ग्रामपंचायत सदस्य विलास शेटजी, प्रशांत मुतकेकर, गीता पाटील, गीता नाईक, पोलीस पाटील संगीता कोळी, मेजर शरद जोशी, पी.के. कांबळे, जयवंत पाटील, काशीनाथ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment