मतदान करा आणि मोफत नेत्रतपासणी करून घ्या...नेत्रतज्ञ डॉ. खडसे.
मतदान करा आणि मोफत नेत्रतपासणी करून घ्या...नेत्रतज्ञ डॉ. खडसे.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजित ठाकुर.
----------------------------
शहरातील अधिका अधिक नागरिकांनी मतदान करावे आणि एकूणच मतदानाची टक्केवारी वाढावी, या उद्देशाने लोणी रोड स्थित कावेरी नेत्रालयच्या वतीने मतदान करणाऱ्यांची नि:शुल्क नेत्र तपासणी करणाचा उपक्रम लोकसभा निवडणुकी च्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत राबवण्यात येणार आहे.
मतदानाचा अधिकार बजावण्यात अजूनही अनेकजण मागे राहतात. अजूनही अनेकांची आपण बरे आणि आपले काम बरे, अशी वृत्ती असते. तसेच काही विशिष्ट वर्गामध्ये मतदानाचे प्रमाण बरेच कमी आहे. या पार्श्वभूमीवर समाजामध्ये मतदानाविषयी समाजामध्ये जागृती वाढावी आणि अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठी कावेरी नेत्रालयात हा नि:शुल्क नेत्रतपासणीचा उपक्रम घेण्यात येत आहे. नेत्र तपासणीसाठी मतदान बजावल्याचा पुरावा म्हणजेच बोटावरील शाई दाखवून या शिबिरात सहभागी होता येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे आणि नेत्र तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन कावेरी नेत्रालयाचे संचालक डॉ.संतोष खडसे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment