संजय राऊत यांची भाजपला अप्रत्यक्षपणे मदत : नंदकुमार कुंभार.
संजय राऊत यांची भाजपला अप्रत्यक्षपणे मदत : नंदकुमार कुंभार.
सांगली काँग्रेसमध्ये फूट पाडू नये ; खा. राऊतांना इशारा.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
इस्लामपूर प्रतिनिधी
---------------------------
उध्दव ठाकरे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. खा. संजय राऊत हेच अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत आहेत. सांगलीतील काँग्रेसमध्ये फूट पाडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम खासदार राऊत यांचे चालू आहे. त्यांनी हे त्वरित थांबवावे असा इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
नंदकुमार कुंभार म्हणाले , सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तिढा मिटलेल्या नाही. शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस हे दोन्ही पक्ष सांगलीची जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत. हा तिढा सुरू असतानाच खा.राऊत हे तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आले आहेत. खासदार राऊत यांनी जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये फूट पाडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे. काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे काम खा. राऊत यांनी त्वरित थांबवावे. खा. राऊत यांनी नाना पटोले हे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतात असा आरोप केला होता. आ. विश्वजीत कदम यांचे विमान गुजरातला सोडू नये असे बोलले होते. तरी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. राऊत यांना तोंड सांभाळण्यास सांगावे. खा. राऊतांच्यामुळेच वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीपासून तुटली आहे . खा. संजय राऊत हेच अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करत आहेत.
Comments
Post a Comment