Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या.

 शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार.

-------------------------

गांधीनगर:- पती व दिराच्या त्रासाला कंटाळून चिंचवाड ता करवीर येथील पुनम चंद्रकांत पाटील वय 37 या विवाहितेने घरी तुळईस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल चंद्रकांत राजगोंडा पाटील वय 53, शशिकांत राजगोंडा पाटील वय 54, दोघेही रा. कळे गल्ली चिंचवाड यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . फिर्याद मृत महिलेच्या मुलगी मेघा चंद्रकांत पाटील वय 19 हीने दिली.


याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी चंद्रकांत पाटील हा मृत महिलेचा पती आहे. त्यांचे लग्न 2004 ला झाले होते. चंद्रकांत व त्याचा भाऊ शशिकांत या दोघांनाही दारूचे व्यसन आहे. चंद्रकांत हा पत्नीस जेवण चांगले केले नाहीस, दारू पिण्यासाठी पैसे दे, अशी मागणी करत वारंवार तिला शिवीगाळ व मारहाण करत असे. दीर शशिकांत हा ही घरगुती कारणावरून भावजयला विनाकारण शिवीगाळ करत मानसिक त्रास देत होता. तू रेल्वे रुळाखाली जाऊन मर असे पती चंद्रकांत तिला दरडावून सांगत भांडण करत असे या त्रासाला कंटाळून जगणं असह्य झाल्यानें पूनमने घरातील तुळईस गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती चंद्रकांत व दीर शशिकांत यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुरे करत आहेत.

Post a Comment

0 Comments