Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आनंद राज आंबेडकरांनी भूमिका केली पोस्ट आधी माघार नंतर होकार, आता लोकसभा निवडणूक लढवणार.

 आनंद राज आंबेडकरांनी भूमिका केली पोस्ट आधी माघार नंतर होकार, आता लोकसभा निवडणूक लढवणार.

----------------------------------

 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र.

अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

पी एन देशमुख

----------------------------------

अमरावती.

कार्यकर्त्याच्या आग्रस्त तसेच मिळणारा पाठिंबामुळे आपण निर्णय बदलल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत माघार घेत असल्याची घोषणा करणाऱ्या आनंदराज आंबेडकर यांनी अखेर निर्णय बदलून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. रविवारी त्यांनी पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यकर्त्यांच्या अग्रस्थ तसेच मिळणाऱ्या पाठिंबामुळे आपण निर्णय बदलण्याचे त्यांनी स्पष्ट केले.डा. बाबासाहेब आंबेडकर चे नातू असलेले आनंदराज आंबेडकर यांनी"रिपब्लिकन सेना"या पक्षावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून दोन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना निघालेल्या त्यांच्या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी न झाल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३ एप्रिलला सायंकाळी आपण उमेदवारी मागत असल्याची जाहीर पत्र काढून"वंचित"ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ४ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आनंदराव आंबेडकर यांना पाठिंबा देत"वंचित"चा उमेदवार अर्ज दाखल करणार नसल्याचे पत्र काढले होते. मात्र यानंतरही आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा हा फसवा असल्याचे सांगत त्यांनी उमेदवारी मागं घेण्याचा निर्णय व ते ठाम असल्याचे जाहीर केले होते

त्यानंतर मागील दोन दिवसापासून ते आपल्या निर्णयाबद्दल मौन बाळगून होते. अशातच त्यांनी रविवारी आपण निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. अमरावती मधून आंबेडकरी समाजाचे नेतृत्व करणारा एकही पक्ष नसल्याने तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वारंवार आग्रहामुळे निवडणूक लढण्याचा निर्णय घेत असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर,"वंचित"चे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल बर्डे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments