कोल्हापूर,हातकणंगले, इचलकरंजी परिसरातील केसरी' गँग टोळीच्या आवळल्या मुसक्या:टोळी प्रमुखासह तिघांना कोल्हापूर जिल्हयातुन केले हद्दपार.

 कोल्हापूर,हातकणंगले, इचलकरंजी परिसरातील केसरी' गँग टोळीच्या आवळल्या मुसक्या:टोळी प्रमुखासह तिघांना कोल्हापूर जिल्हयातुन केले हद्दपार.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

-------------------------------

इचलकरंजी परिसर, हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्हयाचे परिसरामध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हयांना परिणाम देणा-या “केसरी गँग " या नावाने कुख्यात असलेला टोळीचा प्रमुख राहुल शिवाजी केसरी, (रा.आसरानगर गल्ली न. १ इचलकरंजी,) कोल्हापूर, व त्याचे सक्रिय साथीदार अमोल उर्फ रविंद्र शिवाजी कमते, (रा. आसरानगर गल्ली न. ३, इचलकरंजी), चंद्रकांत बाबु आळेकटटी (रा.आसरानगर गल्ली न.१ इचलकरंजी कोल्हापूर) यानी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ पुनःप्रस्थापित करण्यासाठी, पोलीस निरीक्षक इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांचेकडे सादर केलेला होता.


सदर हद्दपारी साठी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी, इचलकरंजी परिसरातील “केसरी' गँग या सराईत संघटीत गुन्हेगारी टोळीचा, टोळी प्रमुखासह तीघांना एक वर्षा करीता कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार केले आहे.





सदर प्रस्तावाची निःपक्षपातीपणे चौकशी ही उप विभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज विभाग यांनी करुन, त्याबाबतचा अहवाल मा.पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांचेकडे सादर केला होता. चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर वेळावेळी मा. हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांचे समक्ष घेणेत आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजु माडंणेसाठी नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी देण्यात आला होता. घेणेत आलेल्या सुनावणीमध्ये, टोळी प्रमुख राहुल शिवाजी केसरी याने निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातुन खुनाचा प्रयत्न, गर्दीमारामारी, बलात्कार, दरोडा, खंडणी, जबरी चोरी,मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारे माला व शरीरा विरुध्दचे गुन्हयांना परिणाम दिलेला असल्याने, टोळीच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीक तसेच समाजामध्ये दहशत माजविणे व सामाजीक स्वस्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सध्या सुरु असलेली लोकसभा निवडणुक प्रक्रिया तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था व सार्वत्रीक हित लक्षात घेवुन, हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, मा.महेंद्र पंडित यांनी ५ एप्रिल रोजी वर नमुद “केसरी गँग” या टोळीचे प्रमुखासह ३ इसमांना कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतुन एक वर्षाचे कालावधी करीता हद्दपारीचे आदेश पारित केलेले आहेत. इचलकरंजी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक यांनी सदर आदेशाची अमलबजावणी केली आहे.


चौकट:


हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणाला दिसून आल्यास, त्यानी पोलीस ठाणेस फोन न.०२३०-२४२२२०० अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे अवाहन मा. महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक साो कोल्हापूर यांनी नागरीकांना केले आहे.


चौकट:


कोल्हापूर जिल्हयातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणा-या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटणासाठी गुन्हेगांरावर तसेच गुन्हेगारी टोळयावंर एमपीडीए तसेच हद्दपारीची कारवाई करणे बाबत मा.महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.