Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांची रेतीतस्करावर कारवाई.

रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजणकर यांची रेतीतस्करावर कारवाई.


--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
रिसोड प्रतिनिधी 
रणजित ठाकूर.
--------------------------------
 रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून अवैद्य गौण खनिज वाहतूक करणाऱ्या रेती तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.गुप्त माहितीच्या आधारे 9 एप्रिल 2024 च्या रात्री 08:30 वाजता चालक शंकर रामेश्वर काळे रा. पेडगाव ता. रिसोड जि. वाशिम हे सतीश रामकृष्ण गरुले रा.पेडगाव ता. रिसोड जि. वाशिम यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. ३७ ए.डी.3322 तसेच ट्राली क्रमांक एच. ३७ क्रमांक अस्पष्ट दिसत असून या वाहनातून दीड ब्रास रेती अवैद्य वाहतूक करताना आढळून आले.याबाबत चालकाला परवाना बाबत विचारणा केली असता कोणताही वाहतूक पास परवाना सोबत न ठेवता अवैद्य रेतीची वाहतूक करीत असल्याचे स्पष्ट झाले.अवैध रेती तस्करी करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने पंचनामा, जप्तीनामा व सुपूर्दनामा करून प्रकरण पुढील कारवाईसाठी कार्यालयात सादर केले आहे.सदर कारवाई रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार डॉ. बाळासाहेब दराडे व त्यांच्या चमुने केली आहे.नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामकाजात व उपयोजना करण्यात मग्न असल्याने रेती तस्कर यांचे चांगलेच फावले असून त्याचा फायदा रेती तस्कर घेत आहेत.रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असूनही रिसोड तालुक्यातील कोणत्या भागात अवैद्य रेती उपसा व रेती वाहतूक सुरू आहे यावर कटाक्षाने लक्ष देऊन आहेत.( माझी सर्व यंत्रणा लोकसभेच्या कामकाजात व्यस्त असल्याने अवैद रेतीची तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच फावले असून ते या संधीचा फायदा घेत आहेत परंतु निवडणुकीच्या कामकाजांबरोबरच रिसोड तालुक्यात होत असलेल्या अवैद्य रेती तस्करावर आमचे बारीक लक्ष असून आमच्या नजरेतून कोणीही सुटणार नाही त्यामुळे अवैद्य रेती तस्कर करणाऱ्यांनी चुकीच्या भ्रमात राहू नये.:-प्रतीक्षा तेजनकर, रिसोड तहसीलदार)

Post a Comment

0 Comments