अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.
अनाधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल.
------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------
गांधीनगर :- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी हरेश तोलाराम कालानी व शंकर तोलाराम कालानी (दोघे रा. गुडलक दुकान समोर गडमुडशिंगी ता करवीर) या बांधकाम धारकावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . याबाबतची फिर्याद नगर रचनाकार गुलाबराव हंबीरराव झांबरे (रा. महाडिक वसाहत कोल्हापूर) यांनी दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी हरेश कालानी आणि शंकर कालानी यांनी वळीवडे ता करवीर गावच्या हद्दीत गट क्रमांक 183/3 या जागेवर नगर रचना विभागाची परवानगी न घेता अनाधिकृत रित्या बांधकाम सुरू ठेवले आहे. त्यामुळे अधिनियम 1966 तरतुदी मधील कायद्याचा भंग करून बांधकाम सुरू ठेवले आहे या कारणावरून गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कांबळे करत आहेत.
Comments
Post a Comment