Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

खाजगी भूखंड स्वच्छ ठेवणे मालकाचे जबाबदारी

 खाजगी भूखंड स्वच्छ ठेवणे मालकाचे जबाबदारी.

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी

 राजू कदम

--------------------------------------

महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालय येथे कर्मचारी अधिकारी बैठक संपन्न अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ आणि उप आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या उपस्थितीत विविध विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

प्रामुख्याने नगररचना आरोग्य आणि बांधकाम विभाग कडील समस्या आणि अडचणी बाबत या बैठकीत चर्चा झाली. कुपवाड आणि लगत परिसरातील खाजगी भूखंड अस्वच्छ असल्याबाबत तक्रारी येत असल्याने त्याचे स्वच्छता करून घेणे त्या भूखंड मालकाचे जबाबदारी आहे त्यांनी स्वच्छता केली नाही तर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्या कामी संबंधितांना दखल घ्यावी आणि कारवाई सत्त्यावर करून सदरचे भूखंड स्वच्छ होतील याकडे लक्ष द्यावे असे यावेळी सूचना हाती आयुक्त श्री अडसूळ यांनी दिला आहे सिंगल युज प्लास्टिक बाबत देखील कारवाई करावी असे उप आयुक्त श्रीमती शिल्पा दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे वसुली कमी आढावा नक्की घेतला जाणार आहे तथापि काही कर्मचारी यांनी यावर्षी चांगली वसुली केले आहे त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे अपुऱ्या सफाई कामगार यांच्या कामाचे चांगले नियोजन करून स्वच्छता करून घेण्या कमी स्वच्छता निरीक्षक यांनी प्रयत्न करावे त्यांना कामस्वरूपी निश्चित करून देऊन त्यावर मुकादम मोफत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतः लक्ष केंद्रित करावे असे यावेळी सांगितले आहे

उपस्थित यांचे स्वागत प्रज्ञावंत कांबळे यांनी केले तर आभार सिद्धार्थ ठोकळे यांनी मांडले आहे सह आयुक्त मानसिंग पाटील कलगुटगी गजानन खुळे इत्यादी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments