Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मतदान म्हणजे देशाच्या विकासासाठी योगदान, मतदान नक्की करा.-रवि अंभोरे अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ.

 मतदान म्हणजे देशाच्या विकासासाठी योगदान, मतदान नक्की करा.-रवि अंभोरे अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ.

--------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

रिसोड प्रतिनिधी  

रणजीत ठाकूर.

-------------------------------

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदार संघाची निवडणूक येत्या 26 एप्रिल रोजी होणार आहे. लोकसभा निवडणूक ही देशपातळीवर देशाच्या विकासाची रचना ठरविणारी महत्वपूर्ण निवडणूक आहे. भारत हा जगातील लोकशाही पद्धतीने राज्यकारभार करणारा सर्वात मोठा देश आहे. स्वतंत्र नंतर काळात भारताची सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली.ती प्रगती वा विकास होण्यामागे राजकीय पक्ष व नेत्यापेक्षाही येथील मतदार राजाने महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचेच निष्पन्न होईल. मतदार हा लोकशाहीचा सर्वोच्च आधार आहे. म्हणून लोकशाहीची सर्वात अधिक भिस्त मतदार राजावर आहे परंतु लोकसभा मतदानाची टक्केवारी पाहली असता मतदार पाहिजे तेवढा जागृत वा दक्ष नसल्याचे लक्षात येते. त्यामुळे कमी मतदानमुळे योग्य उमेदवार निवडून जाईलच असे नाही. एकदा जर अशी चूक झाली तर पुढील पाच वर्ष पच्छाताप केल्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही हा भूतकाळातील अनुभव आहे पर्यायाने त्या मतदार संघाचा किंबहुना देशाचाच विकास थांबतो. म्हणून आता 26 एप्रिलला स्वतःला देशभक्त, देशाचा शुभचिंतक, देशप्रेमी म्हणवून घेण्याची नामी संधी प्रत्येक मतदारांना मतदानाचा हक्क बजावणाच्या माध्यमातून आली आहे. हा देश माझा आहे आणि या देशाच्या प्रगतीत हातभार लावणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे हा दृढनिश्चय करून साध्याच्या राजकीय घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आपली सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवून आपण अतिशय प्रामाणिकपणे मतदान केले पाहिजे. तुमचे मत हे केवळ उमेदवारांना नसते तर देशाला पुढे नेणाऱ्या इथल्या सर्वसामान्य व्यक्तीला जीवन जगताना आधार देणाऱ्या विचाराला असतें.आपण केलेलं मतदान म्हणजे केवळ मतदान नव्हे तर भविष्यकाळातील देशाच्या विकासासाठी केलेलं योगदान आहे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मतदाराने मतदान करावे असे आवाहन रिसोड तालुका श्रमिक पत्रकार संघांचे अध्यक्ष रवि अंभोरे यांनी केले आहे.i

Post a Comment

0 Comments