Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थी जीवनात शिस्त अत्यंत महत्त्वाची प्रदीपराव देशमुख.

 विद्यार्थी जीवनात शिस्त अत्यंत महत्त्वाची प्रदीपराव देशमुख.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड.प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

------------------------------------

 विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिस्त अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन स्थानिक श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरुन बोलत असताना प्रदीपराव देशमुख यांनी केले.


रिसोड येथील श्री शिवाजी विद्यालयामध्ये मानव विकास मिशन अंतर्गत 82 विद्यार्थिनींना मोफत सायकलचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे कोषाध्यक्ष तथा श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद चे अध्यक्ष श्री प्रदीपराव देशमुख हे होते, तर प्रमुख उपस्थितांमध्ये मंचावर रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिमचे अध्यक्ष डॉ.स्नेहदीपभैय्या सरनाईक, स्थानिक शाळा समिती सदस्य संजयकुमार जिरवणकर,ॲड.भूषण पंजाबराव देशमुख, प्राचार्य संजयराव देशमुख, उपप्राचार्य संजयराव नरवाडे, उपमुख्याध्यापक अशोकराव देशमुख, मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशमुख, उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिस खान हे उपस्थित होते. महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजयराव देशमुख यांनी केले. अध्यक्ष स्थानावरून पुढे बोलताना प्रदीपराव देशमुख म्हणाले की स्वर्गीय आप्पासाहेब सरनाईक यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या रूपाने बहुजनांच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दालन उभे केले, त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची सर्वस्व जबाबदारी ही शिक्षकांची असून त्यामध्ये शिक्षकांनी कुठलाही कसूर न करता तन-मन-धनाने काम केले पाहिजे. आजचे युग हे स्पर्धात्मक परीक्षांचे युग असून प्रत्येक विद्यार्थी या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहला पाहिजे याची सर्व जबाबदारी शिक्षकांची असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. याप्रसंगी डॉक्टर स्नेहदीपभैय्या सरनाईक यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय देशमुख यांनी केले तर आभार डिगांबर पाचरने यांनी मानले.

Post a Comment

0 Comments