Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आठ लाखाचा दारुसाठा जप्त; एकास अटक.

 आठ लाखाचा दारुसाठा जप्त; एकास अटक.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंदगड प्रतिनिधी

आशिष पाटील 

--------------------------

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू निर्मिती, वाहतूक, विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाने ढेकोळी, (ता. चंदगड) येथे गोवा मद्य वाहतूकीवर छापा टाकून 7 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 01 एप्रिल 2024 रोजी) ढेकोळी-सुरुते रस्त्यावर करण्यात आली. याप्रकरणी संजय पांडुरंग नाईक (वय 37, रा. हलकर्णी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या आरोपीस अटक केली आहे. 


भरारी पथकांस मिळालेल्या माहितीवरून, ढेकोळी-सुरुते रस्त्यानजिक असलेल्या प्राथमिक शाळेजवळ ही गोवा बनावटीच्या अवैध्य दारूची वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी पाळत ठेवून काल रात्री साडेसातच्या सुमारास दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनास थांबवून तपासणी केली. त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा सापडला.  


याप्रकरणी संजय पांडुरंग नाईक (वय 37, रा. हलकर्णी, नाईक वस्ती, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या आरोपीस अटक केली असून वाहनासह 7 लाख 84 हजार 200 इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये निव्वळ मद्याची किंमत 1 लाख 44 हजार इतकी आहे. या प्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाच्या ठिकाणी मिळुन आलेल्या आरोपी व्यतीरीक्त त्याच्या इतर साथीदाराचा सहभाग आहे का? याबाबतचा तपास सुरू असल्याचे तपासी अधिकारी निरीक्षक एस. एम. मस्करे यांनी सांगितले.


सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक एस.एम.मस्करे, दु.निरीक्षक जी.बी.कर्चे, दु.निरीक्षक ए.बी.साबळे, जवान सचिन लोंढे, मारुती पोवार, राजेंद्र कोळी, विशाल भोई, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला. तर या गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक एस.एम. मस्करे करत आहेत.

Post a Comment

0 Comments