Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दहा वर्षीय देवांश जिरवणकर ने अठरा तास साखळी वाचन उपक्रमांतर्गत केले सलग तीन तास वाचन .

 दहा वर्षीय देवांश जिरवणकर ने अठरा तास साखळी वाचन उपक्रमांतर्गत केले सलग तीन तास वाचन .

-----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

-----------------------------

 स्थानिक स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.13 एप्रिल ला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अठरा तास अखंड वाचन उपक्रम घेण्यात आला. सकाळी 5 ते रात्री 11वाजेपर्यंत हा वाचन उपक्रम साखळी पद्धतीने अखंड सुरु होता यामध्ये रिसोड शहरातील विविध क्षेत्रातील दोनशे पेक्षा अधिक वाचकानी सहभागी होऊन किमान एक तास वाचन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. त्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या खडकी सदार येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या दहा वर्षाच्या देवांश महेश जिरवणकर या बालकाने सायंकाळी 5 ते 8 या तीन तासात सलग वाचन केरून बाबासाहेबाना श्रद्धांजली अर्पण केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अग्निपंख ही पुस्तके अगदी तन्मयतेने वाचून काढली आणि या उपक्रमाबद्दल त्यांनी आयोजकाना धन्यवाद दिले आणि दररोज किमान एक तास वाचनालयात बसण्याचा मानस व्यक्त केला. देवांश चे वडील महेश जिरवणकर हे खडकी सदार त्याच जी प शाळेत शिक्षक आहेत देवांश ला वाचन करणे आवडत असल्यामुळे त्याने वाचनालयात स्वतः पुस्तकाची निवड करून त्याचे सलग तीन तास वाचन केले. देवांश च्या या सहभागाबद्दल वाचन उपक्रम समिती सदस्य प्रा. कमलाकर टेमधरे, जयंत वसमतकर, प्रा. प्रवीण हाडे, रवि अंभोरे, प्रा.शालिकराम पठाडे,गजानन बाजड, गजानन तारपुरे, राहुल अंभोरे, चाफेश्वर गांगवे, काशिनाथ कोकाटे, शिवाजी कव्हर, प्रा. बी एन चव्हाण, मधुसूदन झूनझूनवाला, विश्व्मभर डाखोरे इत्यादिनी देवांश जिरवणकर व त्यांचे वडील महेश जिरवणकर यांचे विशेष कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले. महेश जिरवणकर यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकाचे आभार मानले आणि पुढील वर्षी सलग पाच तास वाचन करण्याचा संकल्प केला.

Post a Comment

0 Comments