ईपीएस ९५ पेन्शन धारकांचा भाजपला मतदान न करण्याचा निर्धार.

 ईपीएस ९५ पेन्शन धारकांचा भाजपला मतदान न करण्याचा निर्धार.

------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

मेढा प्रतिनिधि 

शेखर जाधव

------------------------------------------

वाई :- ईपीएस 95 पेन्शन धारकांची सविचारी सभा रविवार दि . १४ / ०४ / २०२४ रोजी दुपारी एक वाजता वाई मंडई येथे सपन्न झाली . सदर सभेस श्री अप्पा कुलकर्णी , श्री गोपाळ पाटील , यांनी मार्गदर्शन केले .

सभे मध्ये सध्याचे केंद्र शासनाने पेन्शन धारकांची केलेली अवहेलना या विषयी विचार विनिमय झाला . तसेच वारंवार आदोलन करून निवेदन देऊन सुद्धा सध्याचे केंद्र शासनाने भाजप शासनाने कर्मचाऱ्याची दिशाभूल केली आहे . यावर सर्वाचे एकमत झाले व भाजप व त्यांचे मित्र पक्ष यांना कोणत्याही परिस्थितीत मतदान करावयाचे नाही या बाबत एक मताने ठरविण्यात आले .

श्रीकांत पंडीत , श्री सुनील गोळे , श्री . डी .एल. सपकाळ , कॉम्रेड शिवाजी पवार , कॉम्रेड दिग्विजय पवार,यांनी आपले विचार व्यक्त केले . श्री बाळा साहेब पवार , कॉम्रेड प्रमोद परमणे , कॉम्रेड शंकर पवार , श्री गजानन लंगडे , श्री सुरेश पारखे , श्री नारायण बरकडे , विवेक सुर्यवंशी इत्यादी विविध आस्थापनातील सेवा निवृत्त पेन्शनधारक उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.