Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिवडाव परिसरात टस्कर हत्तीचा मुक्काम वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.

 शिवडाव परिसरात टस्कर हत्तीचा मुक्काम वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भुदरगड प्रतिनिधी 

स्वरूपा खतकर

--------------------------------

भुदरगड तालुक्यातील शिवडाव येथील नाईकवाडी जंगलात दाखल झालेल्या टस्कर हत्तीने मुक्काम वाढवल्याने शेतकऱ्यासह ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीच्या भितीमुळे शिवारातील शेतीची कामे खोळंबली आहेत. गेले पाच दिवसापुर्वी शिवडावमध्ये टस्कर हत्तीने दर्शन दिले होते येथील परिसरात टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला असून खाण्यापेक्षा पिकांची नासधूस अधिक प्रमाणात झाली आहे. ऊस व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टस्कर रात्रीच्या वेळी उसाचा शेतीतून जात असल्याने पिके जमीनदोस्त होत आहे. या भागात असणारे मुबलक माड व फणस खायला मिळत असल्यामुळे येथील जंगलचा आसरा घेतला. दिवसा जंगलात तर रात्री नागरी वस्तीत हत्ती येत असल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .तसेच नुकसान केलेल्या पिकांचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments