Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडेत येथे अपघात; कोल्हापूरचा एक ठार.

 राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडेत येथे अपघात; कोल्हापूरचा एक ठार.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

---------------------------------------

खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) जवळील घाटात मंगळवारी सायंकाळी राधानगरीकडून कोल्हापूरला भरधाव वेगात निघालेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात निवास ज्ञानदेव मोहिते

(वय ४९, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर) हे जागीच ठार झाले, तर विनायक आनंदा घोटणे (रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) हे जखमी झाले.

याबाबत राधानगरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी निवास मोहिते हे मंगळवारी सायंकाळी आपल्या मित्रांसह कारमधून (एम एच ०८ झेड

७३७१) राधानगरीकडून कोल्हापूरकडे निघाले होते. खिंडी व्हरवडेनजीक असणाऱ्या घाट रस्त्यावरून येत असताना. चालक प्रशांत बाळासाहेब माने (वय ४०, सध्या रा. बालिंगा, ता. करवीर, मूळगाव चोकाक, ता. हातकणंगले) यांचे भरधाव गाडीवरील नियंत्रण

सुटले व गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेली. या अपघातात निवास मोहिते हे जागीच ठार झाले, तर विनायक घोटणे जखमी झाले. याबाबतची फिर्याद मृत मोहिते यांचे पुतणे जयवंत सुनील मोहिते (रा. कोल्हापूर) यांनी राधानगरी पोलिस ठाण्यात दिली.

अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात खामकर तपास करीत आहेत,

Post a Comment

0 Comments