Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

दीपकराव तिरके यांची रासपच्या लोकसभा प्रभारी पदी निवड

 दीपकराव तिरके यांची रासपच्या लोकसभा प्रभारी पदी निवड.

------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर 

------------------------------

 रिसोड तालुक्यातील वाकद येथील रहिवासी राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष दीपकराव तिरके यांची नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब यांच्या आदेशान्वये व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर तोसिफ शेख यांच्या नियुक्ती पत्राद्वारे त्यांची राष्ट्रीय समाज पक्ष अकोला लोकसभा व वाशिम लोकसभा प्रभारीपदी निवड करण्यात आली ,यावेळी दिपकराव तिरके हे राष्ट्रीय समाज पक्षाचे पक्ष स्थापनेपासून पक्षाच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग दर्शवतात, त्यामुळे त्यांची ही निवड करण्यात आली त्यांची ही निवड म्हणजे पक्षाला उभारी मिळण्याचे सुतोवाच आहे ,राष्ट्रीय समाज पक्षामध्ये त्यांनी चांगले कार्य केल्यामुळे त्यांची दोन्ही लोकसभेच्या प्रभारी पदी निवड करण्यात आली वाशिम लोकसभा व अकोला लोकसभा प्रभारीपदी दीपकराव तिरके यांची निवड झाल्याने पक्षाला नक्कीच याचा फार मोठा फायदा होणार आहे ,त्यामध्ये प्रचार सभा घेणे ,पक्षाची ध्येयधोरण जनतेपर्यंत पोहोचने, निवडणुकी संदर्भात सर्व जबाबदारी जिकरीने पार पाडणे, मतदारापर्यंत उमेदवाराला ,व उमेदवाराचे आणि पक्षाचे विचार पोहोचवणे हे काम दिपकराव तिरके यांच्याकडून होणार आहे, दिपकराव तिरके यांनी त्यांच्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर साहेब, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते ,प्रदेश महासचिव माऊली सलगर, उपाध्यक्ष डॉक्टर तोसीब शेख,यांना दिले यांचा धनगर समाजात फार मोठा दांडगा जनसंपर्क असल्याने पक्षाला याचा नक्कीच फायदा होणार, हे तेवढेच खरे आहे.

Post a Comment

0 Comments