आंबेघर शाळेची परिसर भेट / पाचगणी सहल.

आंबेघर शाळेची परिसर भेट / पाचगणी सहल.

----------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधी

 प्रमोद पंडीत 

----------------------------

मंगळवार दि .17 /04/2024 रोजी आंबेघर शाळेची परिसर भेट सहल डॉ . विजय दिघे यांच्या पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्ट , खिंगर येथे आयोजित करण्यात आली.सकाळी रमणीय व निसर्गांने नटलेल्या ठिकाणी पोहचताच विद्यार्थ्याना खूप आनंद झाला. प्रथमतः सर्वांनी चहा नाष्टा करून जवळच्या टेकडीवर जाऊन ट्रेकिंगचा अनुभव घेतला. बागेत बागडण्यात मुले दंग होती.

🟣🔴🟢🟡🔴🟢🟡

त्यानंतर कान्फरन्स हॉलमध्ये सर्वजण एकत्र जमले .जावली तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे भाग शिक्षण विस्ताराधिकारी मा .श्री.चंद्रकांत कर्णे साहेब  यांनी यावेळी बोलताना शैक्षणिक अनुभवातून विद्यार्थ्यांच्यातील जिज्ञासूवृत्ती जागृत केली .शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्यात अभ्यासातून, कलेतून,खेळातून आपले व्यक्तिमत्व खूप चांगले कसे घडवता येते ; यावर मार्गदर्शन केले.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

        तसेच सेवानिवृत्त केंद्रप्रमुख व रिसॉर्टचे मालक मा .श्री.र.तु .दिघे आण्णा यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे शैक्षणिक अनुभव सांगितले. इंग्रजीसारखी भाषा ही सहजतेने व चुकत चुकत शिकणे खूप आवश्यक आहे .त्यासाठी स्वतःचे प्रयत्न गरजेचे आहेत.

   त्यांच्या रिसॉर्टच्या पुढे अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत .त्यांच्याबद्दल माहिती दिली. व्यवहारज्ञानावर विविध प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना विचार करण्यास चालना दिली.

🌹🌹🌹🌹🌹🌹

शाळेतील राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी श्री.बाबुराव सिताराम बामणे सर, श्री.महेश पालकर सर,श्री. निखिल परकाळे सर, यांचेही अभिनंदन केले. शाळेत काही महिने काम करून नुकतीच बदली झालेले श्री. संदीप धायगुडे सरही या वेळी उपस्थित होते.

🏊🏊🏊🏊

 विद्यार्थ्यांनी स्विमिंग टँक मध्ये पोहण्याचा आनंद मनमुरादपणे घेतला. पोहणे हे कौशल्य शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप छान संधी मिळाली.त्यामुळे अनेक विद्यार्थ्याची पाण्याची भिती नाहीशी झाली व शिकण्यास मदत झाली.

♻️♻️♻️♻️♻️♻️

    दुपारी रिसॉर्टवरील शाकाहारी, मांसाहारी रूचकर जेवणाचे आयोजन केले होते . विद्यार्थ्यांनी यथेच्छ जेवण केले.

🎤🎤🎤🎤🎤

त्यानंतर कॉन्फरन्स हॉलमध्ये विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला . त्यात विदयार्थ्यानी आपल्या देखण्या कलेचे दर्शन घडवून खूप छान कार्यक्रम सादर केला. 

कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून सौ . स्वाती पालकर मॅडम काम पहिले .

 प्रथम तीन क्रमांक आलेल्या  कलाकारांच्या टीमला रिसॉर्ट मार्फत ट्रॉफी देऊन सन्मानित केले. 

🏆🏆🏆🏆🏆

 या उपक्रमात सौ. बामणे,सौ .परकाळे व सौ शीतल दिघे (अंगणवाडी मदतनीस ) यांनीही सहभाग घेतला .

  

डॉ विजय दिघे यांनी स्वत:चे अनुभव सांगून त्याकाळी हालाखीच्या परिस्थितीत  घेतलेले आंबेघर शाळेतील कष्टपद शिक्षण ते त्यांनी   १२ वी सायन्सला त्या काळात मिळवलेली ९४ % गुण हा प्रवास विशद केला तो विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वाटला. ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचे ऋण फेडण्यासाठीच शाळेतील विदयार्थ्यांना हा अनुभव देत असतो. शाळेतील गरीब व यशस्वी विद्यार्थ्यांना ते दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप करतात. ते शाळेला मदत करण्यास सदैव तत्पर असतात . त्यांच्या मुलगा शौर्य दिघे याचा वाढदिवस ते २६ जानेवारी रोजी आंबेघर शाळेत साजरा करतात.

💖💖💖💖💖💖

आंबेघर शाळेतील मुलांना एक आगळा वेगळा व समृद्ध अनुभव देणे. ही खरंचच फार मोठी बाब आहे . डॉ.विजय दिघे त्यांच्या मातोश्री त्यांचे वडील आदरणीय दिघे आण्णा व टेंट हाऊस मधील संपूर्ण स्टाफ यांनी मनापासून विद्यार्थ्याना सर्व सुविधा पुरवल्या . डॉ.विजय दिघे शाळेच्या सहलीवर खर्च करताना कसलाही विचार करत नाहीत. त्यांच्या दातृत्वास सलाम !

🚍🚘🚖 .

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.