Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भेलचे पैसे दिले नाही म्हणून चाकू हल्ला दोघे जखमी दुर्गमानवाड येथील घटना.

 भेलचे पैसे दिले नाही म्हणून चाकू हल्ला दोघे जखमी दुर्गमानवाड येथील घटना.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

------------------------------


कोल्हापूरच्या भेल व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल.

राधानगरी तालुक्यातील दुर्ग मांनवाड येथील विठ्ठलाई देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते या यात्रेला महाराष्ट्रातून तसेच यात्रेकरू येत असतात या ठिकाणी विविध प्रकारची दुकाने लावली जातात त्यामध्ये कोल्हापूर मधील राहुल भोसले यांनी भेल गाडा लावला होता त्या भेल गाड्यावर कसबा तारळे येथील उदय कृष्णाजी पाटील हे भेल खाण्यासाठी गेले होते त्यानंतर पैसे देण्याच्या कारणावरून भेल चालक व राहुल भोसले यांच्यात बाचाबाची झाली बाचाबाची नंतर मारहाण करण्यात आल्यावर राहुल भोसले यांचा मुलगा राजवीर भोसले याने उदय यास माझ्या वडिलास का मारलेस असे म्हणून राजवीर यांनी जयसिंग पाटील यांच्या डोक्यात काठीने मारून जखमी करून जीवे मारणे दृष्टीने जयसिंग त्यांच्यावर छातीत डाव्या बाजूला चाकूने भोसकून गंभीरित्या जखमी केले असून याबाबतची फिर्याद जयसिंग पाटील यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिल्यावर राधानगरी पोलिसांनी राहुल भोसले व त्यांचा मुलगा राजवीर भोसले कोल्हापूर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे हेड कॉन्स्टेबल खामकर हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments