चला मतदान करूया गोवर्धन येथे मतदान जागृती.
चला मतदान करूया गोवर्धन येथे मतदान जागृती.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
------------------------------------
गोवर्धन. येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी मध्ये मतदानाच्या टक्केवारी वाढविण्याकरिता येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी मतदान करावे असे विद्यार्थ्यांनी आपल्या संदेश म्हटले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ची विविध कामाची जबाबदारी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. गोवर्धन येथे जनजागृती कार्यक्रम प्रसंगी मंडळ अधिकारी लोखंडे तलाठी बाविस्कर, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका मदनीस तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment