Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्वरा वेल्फेअर फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने वृक्षाधिकारी, वृक्ष प्राधिकरण समिती, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या कार्यालयात बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल.

 स्वरा वेल्फेअर फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने वृक्षाधिकारी, वृक्ष प्राधिकरण समिती, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या कार्यालयात बेकायदेशीर वृक्षतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तक्रार दाखल.

 10 एप्रिल रोजी सकाळी ताराबाई पार्क परिसरातील हिंमतबहादुर कमानी समोर रि. स. क्रमांक 2039/2 या खाजगी मिळकतीत विकासाक असलेल्या बालाजी डेव्हलपर्स चे दिग्विजय घोरपडे यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता दोन आंब्याची एक चिक्कूच तर एक जांभळाचं आणि एक गुलमोहराचे जे की ४० वर्षाहून अधिकजुने फळधार वृक्ष तोडण्याचा सपाटा लावला. या ठिकाणच्या काही जेष्ठ नागरिकांनी तसेच शेजाऱ्यांनी सदरच्या वृक्षतोडीला विरोध केला तसेच शाहूपुरी पोलिसांना फोन वरून तक्रार दिली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर जागेवर आल्यानंतर पोलिसांनी सदरची बाब दखलपात्र असताना तात्पुरती वृक्षतोड थांबवले. याबाबत शेजाऱ्यांनी महानगरपालिकेच्या उद्यान अधीक्षकांना तक्रार केल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सदरच्या ठिकाणी पाठवून दिले. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठांच्याकडे हे प्रकरण सुपूर्द केले. बारा तारखेला याबाबतच्या नोटीस संबंधितांना देण्यात आली. वृक्षतोड झाले असताना महानगरपालिकेने सदरच्या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन पंचनामे केले. एका पंचनाम्यात जुजबी स्वरूपात फांद्या तोडल्याची पंचनामा केला. मात्र सदरच्या ठिकाणी जागरूक नागरिक आणि पत्रकारांनी या वृक्षतोडीचे चित्रण केल्याचे समजताच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुसरा पंचनामा करत वृक्षतोडीचा नोटीसी संबंधितांना दिले आहेत. सुरुवातीपासूनच महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे संबंधित विकासकाला कोणत्याही स्वरूपाचे कायदेशीर त्रास होऊ नये अशी भूमिका घेतल्याचे या दोन पंचनामावरून स्पष्ट होते. कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क ,नागाळा पार्क हा भाग दाट हिरवाईने नटलेला असून या ठिकाणी ५० वर्षाहून अधिक वयोमान असलेली अतिशय मौल्यवान आणि हिरटेज अशी वृक्ष संपदा आहे. मात्र काही विकासकांच्या गगनचुंबी प्रकल्पाआड येणाऱ्या वृक्षांची अतिशय बिंदिकतपणे कोणाच्याही मुलाहिजा न बाळगता सर्रास वृक्षतोड सुरू असल्याचं परिसरातून समजते. स्वतः महानगरपालिकेच्या आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा विकासाकाला गुन्हा दाखल करून अद्दल घडवावी. जेणेकरून यापुढे कोणीही बेकायदेशीर वृक्षतोडी करताना दहा वेळा विचार करेल अशी मागणी या परिसरातून होत आहे. स्वरा फाउंडेशनच्या वतीने माजगावकर यांनी तक्रार अर्ज दाखल केला असून येत्या काही दिवसात संबंधित विकासकावर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments