गांधीनगरात पूर्व वैमन्याशातून केलेल्या मारहाणीत दोघेजण जखमी दोघा जणांसह चार अज्ञातावर गुन्हा दाखल
गांधीनगरात पूर्व वैमन्याशातून केलेल्या मारहाणीत दोघेजण जखमी दोघा जणांसह चार अज्ञातावर गुन्हा दाखल.
गांधीनगर:
- पूर्ववैमन्यशातून गांधीनगर ता. करवीर येथील व्यापारी कैलास गोवालदास कटार व संजय हेमणदास चुगानी दोघेही रा. गांधीनगर यांना दुकानात शिरून खुर्च्या, स्टूल, व स्टीलच्या पाण्याच्या बाटलीने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अक्षय दीपक चावला, प्रशांत मिसाळ उर्फ बाल्या व अज्ञात चार जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सिंधी सेंट्रल पंचायत चे अध्यक्ष गोवालदास कटार यांचे हे दुकान असुन कैलास त्यांचा मुलगा आहे.
मंगळवारी दुपारी अक्षय चावला, बाल्या मिसाळ व त्यांचे चार अज्ञात साथीदार गांधीनगर मेन रोडवरील पूनम होजिअरी या दुकानात घुसले. आणि अक्षय चावला एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलीच्या विषयावरून कैलासला जाब विचारत दुकान मालक कैलास कटार यांना खुर्च्या, स्टूल, स्टीलच्या पाण्याच्या बाटलीने आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना सोडवण्यासाठी दुकानात असणारे कैलास चे मित्र संजय चुगानी यांनी प्रयत्न केला. त्यांना सुद्धा मारहाण झाली. त्यात तेही गंभीर जखमी झाले. या दोघांना प्राथमिक उपचारासाठी गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले. याबाबतची फिर्याद गोवालदास झमटमल कटार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत.
.
Comments
Post a Comment