Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

येवता येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.

 येवता येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजितसिंग ठाकूर  

---------------------------- 

       रिसोड तालुक्यातील आज दिनांक २४/४/२०२४ रविवार महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते ,यावेळी येवता येथील व परिसरातील भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला ,सतत धार्मिकतेची ओढ असलेल्या आणि या गावांमध्ये  महंत शांतीपुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वर संस्थान येवता येथे दरमहा ,दरवर्षी काही ना काहीतरी कार्यक्रम, विविध उपक्रम ,धार्मिक उपक्रम चालू असतात या संस्थांमध्ये रविवार दिनांक 14/ 4 /2024 रोजी श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते तेव्हापासून ते आजपर्यंत 21/ 4 /2024 गेल्या आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल चालू होती ,या आठवड्यामध्ये या सप्ताहामध्ये विविध महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराची कीर्तन रुपी सेवा येवता परिसरातील एक फार मोठी मेजवानी ठरली, यामध्ये या कीर्तनरुपी सेवेसाठी गावातील दानशूर व्यक्तींनी फार मोठे मोलाचे सहकार्य केले, महंत शांतीपुरीमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम गावकऱ्यांनी फार मोठ्या उत्साहात पार पाडला कीर्तनकार ,भागवत कथा प्रवक्ते, भजनी मंडळ, वारकरी मंडळ यांच्यासाठी जे काही देणगी देण्याचेही हातभार लावला गावकऱ्यांनी सढळ हाताने दिली ,यावेळी आज रविवार 21/४/२४ ला सकाळी नऊ ते अकरा काल्याचे किर्तन नंतर महाप्रसादाला सुरुवात झाली दिवसभर महाप्रसाद चालला या संस्थांनमध्ये अन्नदान हे श्रेष्ठदान समजले जाते, त्यामुळे सोमवार गुरुवार आठवड्यातून बरेच दिवस आठवड्यातून आठवड्यात महिन्यात आठवड्यात काही ना काही धार्मिक उपक्रम या ठिकाणी चालू असतात ,या ठिकाणी सामाजिक राजकीय तसेच विविध मान्यवर नेहमीच या संस्थांमध्ये भेटी देत असतात ,तसेच गावकरी सुद्धा या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करतात, येवता येथील युवा मंडळींनी या कार्यक्रमासाठी फार मोठी मेहनत घेऊन सप्ताह चांगल्या पद्धतीने पार पडला.

Post a Comment

0 Comments