Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सुभेदार आयुब मकबूल मुलाणी ३८ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते सत्कार .

 सुभेदार आयुब मकबूल मुलाणी ३८ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते सत्कार .

------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शाहुवाडी तालुका प्रतिनिधी 

आनंदा तेलवणकर

------------------------------------

शाहुवाडी : येळाणे येथील सुभेदार आयुब मकबूल मुलाणी यांना सुरूवातीपासूनच भारतमातेची सेवा करण्याचा ध्यास होता. घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते १५ डिसेंबर १९८५ साली सैन्यात भरती झाले.त्यानंतरच्या काळात त्यांनी बेळगाव,श्रीनगर,गुजरात,राजस्थान,बंगाल,आसाम,मुंबई अशा विविध ठिकाणी सेवा बजावून ते ३१ मार्च २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले.प्रामाणिकपणे देशसेवा करून तरूणांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या या मनमिळाऊ सुपुत्राला त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त व पुढील वाटचालीसाठी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी शुभेच्छा दिल्या

यावेळी शाहूवाडी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे(आप्पा),येळाणे गावचे सरपंच उल्हास भोसले,माजी सरपंच गणेश पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील,माजी तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल मोरे,येळाणे ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील,सिंकदर मुलाणी,अस्लम मुलाणी,रियाज शेख यांच्यासह येळाणे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी,माजी सैनिक संघटना,मुलाणी कुटुंबिय व येळाणे ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments