उचगावातून तरुण बेपत्ता.
उचगावातून तरुण बेपत्ता.
---------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------
गांधीनगर:- कंपनीत जाऊन येतो असे सांगून राहत्या घरातून संभाजी दिनकर पोवार (वय 43 रा. जानकीनगर, उचगाव पूर्व ता करवीर) निघून गेल्याची फिर्याद पत्नी गायत्री संभाजी पोवार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी संभाजी पोवार हा खाजगी कंपनीत काम करत होता. घरातून पत्नीला कंपनीत जाऊन येतो असे सांगून निघून गेला आहे तो अद्याप परत आला नाही. रंगाने गोरे, अंगाने मजबूत, उंची पाच फूट तीन इंच, नाक सरळ, काळे केस, आकाशी रंगाचा शर्ट व काळया रंगाची जीन्स पॅन्ट आहे. घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाले असून अशा आशियाची व्यक्ती कोणास सापडली तर त्यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याची संपर्क साधावा असे आवाहन पोलीस नाईक रूपाली पोकर्णेकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment