Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नवनीत राणांना"सुप्रीम कोर्टाचा दिलासा"जात प्रमाणपत्र बाबत दिला महत्त्वाचा निकाल.

 नवनीत राणांना"सुप्रीम कोर्टाचा दिलासा"जात प्रमाणपत्र बाबत दिला महत्त्वाचा निकाल.

------------------------------------------

फ्रंटलाईन  न्यूज महाराष्ट्र

अमरावती जिल्ह प्रतिनिधी.

पी.एन. देशमुख

------------------------------------------

सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता. आज या प्रकरणी अंतिम निकाल देण्यात आला असून नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळालेल्या नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा मुंबई हायकोर्टाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने बदलत राणा यांची जात प्रमाणपत्र वैद्य ठरविले आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच नवनीत राणा यांचा कायदेशीर अडचण दूर झाली आहे. मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्र २०२१ मध्य अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनवणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच, बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोन्ही गटाचा युक्तिवाद २८ फेब्रुवारीला पूर्ण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी आपला निकाल राखून ठेवला होता. आज या प्रकरणी अंतिम निकाल आला असून नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निकाल देताना न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने सांगितले की छाननी समितीने योग्य चौकशी करून आणि संबंधित कागदपत्राचा विचार करून नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्र वैद्य ठरवले आहे. त्यामुळे छाननी समितीच्या निष्कर्षात कोणताही हस्तक्षेपाचा गरज नसल्याचा सांगा सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय बदलण्याची राणा यांची विनंती मान्य केली आहे. मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. नवनीत राणा यांच्या वडिलांनी डबा टाकून बोगस शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झाले होते. तसेच हायकोर्टातील अनेक तारखांना नवनीत राणा आणि त्यांचे वडील गैरहजर राहिले होते. नवनीत राणा व त्यांचे वडील गैरहजर राहिले होते. नवनीत राणा आणि त्यांच्या वर्ल्ड वडीला विरोधात बुलंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments