राजकारणात मोठा गोंधळ उडल वळीवडे येथे श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत बाबुराव डोणे महाराज यांची भाकणूक.

राजकारणात मोठा गोंधळ उडल वळीवडे येथे श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत बाबुराव डोणे महाराज यांची भाकणूक.

-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 
 शशिकांत कुंभार 

-------------------------------

गांधीनगर:- राजकारणात मोठा गोंधळ हुईल, जातीय वादाचं राजकारण देशात घडल, आणि शंभर वर्षानंतर माणूस पृथ्वी सोडल अशी भाकणूक वळीवडे येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेतील धार्मिक कार्यक्रमात बाबुराव ढोणे महाराज( वाघापूर )यांनी केली.
महाराज म्हणाले सत्य, फासावर जाणार, राष्ट्रा राष्ट्रातील वाद उफाळून येणार, कोरोना पेक्षाही महाभयंकर रोगराई पसरणार, भारत देश जगावर राज्य करल, बारा वर्षाच्या मुलीची आई होईल, उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल, उंदराला भिणार पण वाघाला भिणार नाहीसा, मेंढी पालखीत मिरवल, जो सत्याण वागील आणि माझी सेवा करल त्याला पोटाशी धरण अशी भाकणूक डोणे महाराज यांनी केली. यावेळी समस्त धनगर समाज, यात्रा कमिटी, मानकरी, रयत, ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान बुधवारपासून सुरू असणाऱ्या त्रैवार्षिक यात्रेत विविध स्पर्धांचे, आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . त्यासाठी यात्रा कमिटी ग्रामपंचायत प्रशासन यांनी परिश्रम घेऊन यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

फोटो ओळ:- वळीवडे ता.करवीर येथे सुरू असणाऱ्या ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत धार्मिक कार्यक्रमात भाकणूक करताना बाबुराव डोणे महाराज व ग्रामस्थ ( छाया बाबासाहेब नेर्ले)

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.