Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोहा शहरात तरुणाची गळफास लावून आत्महत्या.

 लोहा शहरात तरुणाची गळफास लावून आत्महत्या.

------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

------------------------

                शहरातील श्रीराम नगरात राहणारा अठ्ठावीस वर्षीय तरुण व्यवसायीकाने स्वतःच्या राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. २१ रोजी सकाळी दहा ते साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी  गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

              लोहा तालुक्यातील आडगाव येथील शेतकरी कुटुंबातील जयदत्त संजय क्षीरसागर (वय २८) हा मागील कांहीं वर्षांपासून लोहा शहरात वास्तव्यास असून त्याचा लोहा शहरात स्वतंत्र व्यवसाय होता. मयत जयदत्त क्षिरसागर यांच्या नातेवाईकांकडे दि. २१ रोजी लग्न आसल्याने त्यांचे आई-वडील, पत्नी हे सर्व जण लग्नाला गेल्याने ते एकटेच घरी होते.  नेमके त्याच संधीचा फायदा घेत शहरातील श्रीराम नगरातील राहत्या घरी सकाळी दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास जयदत्त याने छताच्या पंख्यास गळफास घेवून जीवनयात्रा संपविली. मात्र मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. लोहा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. लोहा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विनायक कुलदीपक यांनी प्रेताची उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Post a Comment

0 Comments