Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगूडमधे मंदिर आणि परिसराची स्वच्छता.

 मुरगूडमधे मंदिर आणि परिसराची स्वच्छता.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड/ प्रतिनिधी

जोतीराम कुंभार

------------------------------

  मुरगुड येथील बिरदेव यात्रेच्या अनुषंगाने काशिलिंग व आगामी श्री राम नवमी या दोन्ही मंदिरांची आणि परिसराची स्वच्छता मुरगुड येथील तरुणांमार्फत करण्यात आली. सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत ही स्वच्छता सुरू होती सर्वप्रथम मुरगुड येथील श्रीराम मंदिर झाडून घेऊन त्यानंतर अग्निशामक दलाच्या पाणीपुरवठा मार्फत धुवून घेण्यात आले यानंतर अंबाबाई मंदिराच्या परिसराची स्वच्छता करून तरुणांनी काशिलिंग बिरदेव मंदिर परिसरातील कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली त्यानंतर मंदिराची आणि परिसर पाण्याने धुऊन काढला तसेच यात्रा निमित्ताने घालण्यात येणाऱ्या मांडवाच्या ठिकाणी पाणी मारून रोलिंग करण्यात आले या ठिकाणी असणारे छोटे-मोठे दगड देखील एकत्र करून बाजूला ठेवण्यात आले यावेळी श्रीराम मंदिराची पुजारी अनुबोध गाडगीळ, जगन्नाथ पुजारी, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार जगदीश गुरव, संकेत शहा, प्रकाश पारिषवाड, आनंदा रामाने , शिवाजी चौगुले,महेश कुलकर्णी यांच्यासह तरुण उपस्थित होते

Post a Comment

0 Comments