Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा गोडोली येथे खून करून परप्रांतात पशार झालेल्या आरोपीस बिहार राज्यातून सातारा डी.बी.पथकाने केली अटक.

 सातारा गोडोली येथे खून करून परप्रांतात पशार झालेल्या आरोपीस बिहार राज्यातून सातारा डी.बी.पथकाने केली अटक.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

अमर इंदलकर

 ------------------------------

जुन्या भांडणाच्या कारणावरून दिनांक 30/10/2023 रोजी रात्री सातारा गोडोली येथील तळ्याजवळ एका परप्रांतीय युवकांने बालाजी सोमनाथ रेड्डी राहणार करंजे, म्हसवेरोड सातारा.यास हत्याराने गंभीर मारहाण केली होती, त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तो मयत झाला होता. मयताचा भाऊ मनीष सोमनाथ रेड्डी राहणार करंजे म्हसवे रोड सातारा, यांनी दिलेल्या तक्रारीवरून खुणाचा गुन्हा नोंद केला गेला होता. सदरचा खून करणारा हा परप्रांतीय असून तो 8-10 वर्षापासून साताऱ्यात राहाण्यास होता. त्याने खून केल्यानंतर तो परराज्यात पळून गेला असल्याची माहिती पोलिसांना तपासात समजली होती. सदर आरोपीचा शोध हा पोलिसांनी उत्तरप्रदेश येथे त्याच्या गावी व इतर ठिकाणी शोध घेतला होता. पण तो तेथून देखील नेपाळ देशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.सदर आरोपीचा नक्की ठावठिकाणा समजून येत न्हवता. सदर आरोपीची तांत्रिक तशेच गोपनीय माहिती काढण्याचे काम सातत्याने सुरूच होते.सदर आरोपी हा बिहार राज्यात गया ह्या ठिकाणी असलेबाबतची माहिती सातारा डीबी पथकास मिळाली, बिहार राज्यातील गया ह्या ठिकाणी जाऊन सातारा डीबी पथकाने सलग दोन दिवस आरोपीचा शोध वाडी वस्तीवर घेतला.स्थानिक रहिवाशी यांना पोलीसांकडील फोटो दाखवला जात होता. परंतु ओळख पटत न्हवती तरी देखील पोलिसांनी स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे काही संशयीताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यातील एक युवक स्वतःची ओळख लपवण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचा संशय आला होता. सदर युवकाने मोठे केस व दाढी वाढवल्याने पोलिसांकडे असलेल्या फोटोशी फक्त मिळता जुळता चेहरा दिसत होता.पण सदरचा युवक त्याचे नाव गाव व इतर माहिती खोटी देत होता.पोलीस त्याच्याशी हिंदी भाषेत चौकशी करत असताना नकळत त्याच्या बोलण्यातून सातारी भाषेचा वापर झाल्याने पोलिसांनी कसोशीने चौकशी केली असता त्याने त्याचे खरे नाव सांगून त्यानेच खून केला असल्याची कबुली पोलिसांना अखेर दिली. सदर आरोपीचे नाव हे नरेंद्र उर्फ छोटू रामदीन चौधरी/ पटेल. मूळ राहणार पैडी खुर्दे जिल्हा सिंद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश. असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के,पोलीस निरीक्षक(गुन्हे) निलेश तांबे,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटीकरणाचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार सुजीत भोसले,निलेश जाधव. पो.ना. पंकज मोहिते, विक्रम माने. पो कॉ इरफान मुलाणी, संतोष घाडगे,सागर गायकवाड,विशाल धुमाळ,मच्छिन्द्र माने, सचिन रिटे,सुशांत कदम यांनी केलेले आहे.

Post a Comment

0 Comments