Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोह्यात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा

 लोह्यात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा.

----------------------------     

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

----------------------------- 

                      जैन धर्माचे चोविसावे तिर्थकर भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त रविवारी लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरून महविरांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

          लोहा शहरातील देवुळगल्ली भागातील भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे दि. २१ रोजी सकाळी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे अभिषेक व पूजा विधी करून महाविरांच्या प्रतिमेची लोहा शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मिरवणुकीत जैन समाज बांधव "महावीरजी का क्या संदेश.. जिओ और जीने दो" "त्रिशला नंदन वीर की.. जय बोलो" "जैन धर्माचा विजय असो" आदी घोषणा देत होते. सदरील शोभायात्रा देवुळगल्ली, जुना लोहा रस्ता, नगरेश्वर मंदिर, भाजी मंडई, बसस्थानक, सराफा मार्केट, शिवकल्याण नगर मार्गे देवुळगल्ली येथील जैन मंदिरात विसर्जित करण्यात आली.

               मूर्ती अभिषेकाचा मान तसेच महाप्रसादाचा मान यावेळी राजकुमार घंटे व दिनेश घंटे यांना मिळाला. शोभायात्रेत अबाल वृद्धांसह महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी विविध संस्था, संघटनेच्या पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी भगवान महाविरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments