17 वर्षापासुन पर्यावरणं संवर्धनाचा कुटुंबाने घेतला वसा,मुलंगे दांपत्य करतात रोप निर्मिती व वितरण.
17 वर्षापासुन पर्यावरणं संवर्धनाचा कुटुंबाने घेतला वसा,मुलंगे दांपत्य करतात रोप निर्मिती व वितरण.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड.प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
----------------------------
येथील गजानन व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सिमा मुलंगे ह्यांनी जलद गतीने होत असलेल्या पर्यावरणाच्या र्हासाला आळा बसविण्याच्या दृष्टिकोनातून गेल्या 17 वर्षा पासून खारीचा वाटा उचलत घरगुती रोपवाटिके मध्ये आंबा,वड,पिंपळ,जांभुळ,बेल,लिंबू,चिंच,सीताफळ ईत्यादि रोपांची निर्मिती करून त्यांचे गरजवंत वृक्ष प्रेमींना नियमितपणे वितरण करत आलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी छोट्या- मोठ्या विविध प्रकारच्या 30000 रोपांचे वितरणं केले नव्हे तर अनेक शेत मालकांना, विविध कार्यालयाच्या अधिकार्यांना तसेच मंदिराच्या पुज्यार्यांना संबंधीत ठिकाणी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यास प्रोत्साहित केले.गेल्या अनेक वर्षापासुन खाद्यपदार्थ किंवा किराणा मालाच्या मार्फत उपलब्ध होणार्या छोट्या- मोठ्या टाकाऊ पण टिकाऊ मजबुत प्लॅस्टीक पिशव्यांमध्ये मुलंगे ह्यांनी विविध प्रकारची रोपे तयार करून आजतागायत त्यांचे वितरण केलेले आहे.त्यांच्या स्व.पार्वतीबाई मुलंगे घरगुती रोपवाटिकेला आतापर्यंत अनेक अधिकारी,पदाधिकारी तसेच सामाजिक वनिकरण विभागाच्या विविध मान्यवरांनी भेटी दिल्या.त्यांच्याकडे येणार्या मजुर,अधिकारी तसेच पाहुण्यांचे स्वागत ते एखादे रोपटे देऊनचं करतात हे विशेष. त्यांच्या म्हणण्यानुसार वर्षानुवर्ष वाढत्या तापमानाचा आलेख आणि पावसाळा ऋतु मध्ये निर्माण होणारी अनियमितता हे आतापर्यंतच्या अंदाधुंद वृक्षतोडीचा दुष्परिणाम आहे.प्रदुषित हवामानाचा फटका फक्त बळीराजांनाचं बसतो आपल्याला त्याचे काय?असे जर कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आत्ताचं मनातून काढून टाकावा.पंधरा दिवसापूर्वी जलप्रलया मुळे दुबई मध्ये उडालेला हाहाकार विसरून कसे चालणार.यावर्षी उन्हाळ्या मध्ये वारंवार होणार्या पावसा मुळे नगदी पिकं द्राक्ष,आंबा ह्यामध्ये निर्माण होणारा आंबटपणा,टरबुज,खरबुज तसेच चिकू मध्ये निर्माण होणार्या बेचवपणा मुळे व्यापार् यांचे होणारे अतोनात नुकसान तसेच रसवंती,मठ्ठा,लस्सी ईत्यादी छोट्या दुकानावर होणारे दुष्परिणाम चिंतेची बाब आहे.हवामान शुध्दीकरण करिता चालु " मे "महिन्यामध्ये बेल,लिंबू,आंबा,जांभुळ,चिंच,मोह ईत्यादी बीया उपलब्ध होतात येत्या जून महिन्यामध्ये प्रत्येकाने फक्त दोनचं रोपे तयार करून जूलै महिन्यामध्ये त्याची लागवड करून संवर्धन करावे,तर आणि तरच भारतामध्ये 5000 कोटी वृक्षांची निर्माण झालेली तुट भरून निघेल.असे आव्हान ते वाचकांना करत आहेत.
Comments
Post a Comment