Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री च्या पालखी19 जूनला वाशिम जिल्ह्यात* 22 जून रोजी रिसोड शहरात आगमन.

 श्री च्या पालखी19 जूनला वाशिम जिल्ह्यात*  22 जून रोजी रिसोड शहरात आगमन.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

 रणजीत ठाकूर.

-------------------------

श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव च्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या पालखीचे आगमन वाशिम जिल्ह्यात ता 19 जूनला होत आहे तर ता 20 जून रोजी ही पालखी मालेगाव शहरात प्रवेश करणार आहे

 भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी सालाबाद प्रमाणे याही वर्षी ता 13 जून रोजी आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूर करिता  मार्गस्थ होणार आहे . या पालखीचे वाशिम जिल्ह्यात 19 जून 2024 रोजी आगमन होणार आहे. श्रीच्या पालखीचे 20 जूनला मालेगाव येथे आगमन होणार आहे .

   यंदा पालखीचे 55 वे वर्ष असून इकडून जाताना 33 दिवसांची पायदळ वारी करीत पालखीसह ७०० वारकरी पंढरपूरला दाखल होणार आहेत. सदर पायदळ पालखी ही अकोला जिल्ह्यातील पातुर येथून 19 जून रोजी वाशिम जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या मेडशी येथे दाखल होणार आहे. श्री च्या पालखीचे श्रीक्षेत्र डव्हा येथे रात्री मुक्काम राहणार आहे तर 20 जूनला मालेगाव शहरात सकाळी 8.00  वाजता पालखीचे आगमन होणार आहे.ता  20 जूनला पालखी रात्री शिरपूर येथे मुक्कामी राहणार असून ता 21 जून रोजी चिचांबापेन येथून केशवनगर , वरून मसला पेन,येथे मुक्कामी राहणार आहे  तर ता 22 जून रात्री रिसोड येथे मुक्कामी राहणार आहे  श्रीच्या दर्शनाची उत्सुकता व पालखीच्या आगमनाची प्रतीक्षा भाविकांना आहे  पालखीचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागोजागी स्वागत केले जाणार असून श्रीच्या मूर्तीचे दर्शन भाविकातर्फे घेतल्या जाणार आहे तर 55 वर्षाची परंपरा जोपासत श्रीच्या पालखीतील वारकऱ्यांच्या नाश्त्याची व भोजनाची व्यवस्था याही वर्षी मालेगांव व रिसोड तालुक्यातील शहरात व गावागावात नास्ता, जेवणाची व्यवस्था केल्या जाणार आहेत . सदर पालखीत सुशोभित रथ व त्यावर श्री संत गजानन महाराजांचा मुखवटा तसेच पालखीत ७०० वारकरी भगवे  ध्वज पताका,तुळशी वृंदावन  घेऊन सहभागी होणार आहेत 

--------

फोटो - श्री संत गजानन महाराज

Post a Comment

0 Comments