7 गावठी हातभट्टीवर छापा; 1,86,280/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.

 7 गावठी हातभट्टीवर छापा; 1,86,280/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.

 -------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

 -------------------------------

कणेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील साईनगर, कंजारभाट वसाहतीमध्ये पहाटेचे वेळी गावठी हातभट्टीची दारु तयार करतात.अशी माहिती स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अमंलदार तसेच गोकूळ शिरगांव पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार यांचे पथकाने दि. 24.05.2024 रोजी पहाटे साईनगर, कंजारभाट वसाहत, कणेरीवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारु तयार करणा-या 07 भट्टयावर छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या. हातभट्टीची दारु तयार करण्याकरीता वापरत असणारे 5,600 लिटर कच्चे रसायन, 200 लिटर पक्के रसायन, 20 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व इतर साहित्य असा एकूण 1,86,280/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच नष्ट केला व गावठी दारू तयार करणाऱ्या आरोपी 01 ) काजल रोहित घारूंगे, 02 ) हिना किशोर बागडे, 03 ) सुरेखा राजेश घारूंगे, 04) संदिप दिपक घारूंगे, 05)उमा अर्जुन अभंगे, 06 ) पुजा सनी बाढुंगे व 07 ) स्वाती किसन बागडी सर्व रा. साईनगर, कंजारभाट वसाहत, कणेरीवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचे विरुध्द गोकूळ शिरगांव पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार महिला. सहा. फौजदार श्रीमती शहनाज कनवाडे, संजय पडवळ, संजय हुबे, संतोष पाटील, अमित सर्जे, निवृत्ती माळी, सोमराज पाटील, शिवानंद मठपती तसेच गोकूळ शिरगांव पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार प्रकाश भवारी, नितीन सावंत, संदिप कुंभार व हौसिंग पाटील यांनी मिळुन केली

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.