Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कडक उन्हात ही प्रचार यंत्रणा शिगेला.

 कडक उन्हात ही प्रचार यंत्रणा शिगेला.

-----------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर

-----------------------------

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना आप आपल्या नेत्यांच्या पाठीराख्यानी  पायाला भिंगरी बांधली आहे  ,, 

रविवारी प्रचाराची सांगता होत असून मिळत असलेल्या वेळेत जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत  आप आपला पक्ष - चिन्ह- भूमिका ध्येय धोरणे पोहचण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत आहेत भर उन्हात ही लोकांच्या पर्यत पोहण्याचा प्रयत्न करत आहेत 

लोक ही एवढ्या उन्हात आपल्या दारात येणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत आहेत थंड पाणी- पेय देऊन कार्यकर्त्यांना दिलासा देत आम्ही सोबत असल्याची जाणीव करून देत  आहेत ,

मोबाईल चा वापरत करत सोशल मीडियाचा ही पुरेपूर वापर तरूणाई करत असून याद्वारे फोटो व्हडिओ पोस्ट शेअर करत आप आपल्या पक्षाचा प्रचार  जोरदार करत आहेत 

लोकशाहीच्या या उत्सवात कडक उन्हात ही लोक सहभागी होत असून  घटत चालेला मतदानाचा टक्का ही वाढण्याची शक्यता आहे

Post a Comment

0 Comments