शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उंचगाव येथे पेन्शनचे वाटप.
शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उंचगाव येथे पेन्शनचे वाटप.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------------
उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढाकाराने 'बँक आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत ७ लाख रुपयांच्या रकमेची शासकीय योजनेतील पेन्शन ३०० लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी वाटप करण्यात आली.
संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा मार्केट यार्ड येथे पेन्शन दिली जाते.पेन्शनधारक हे सर्वाधिक जेष्ठ नागरिक असल्याने व सद्या असलेल्या कडक उन्हामुळे त्यांना मार्केट यार्ड येथे जाणे गैरसोयीचे व त्रासाचे होते. त्यामुळे 'बँक आपल्या दारी' या उपक्रमाअंतर्गत बँकेच्या सहकार्यातून करवीर शिवसेनेच्या वतीने उंचगावातील पेन्शन धारकांना आज उंचगाव येथील मंगेश्वर मंदिर या ठिकाणी कॅम्पद्वारे पेन्शन वाटप करण्यात आली. करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने आज ३०० लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप करण्यात आले.*
*यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,अजित चव्हाण, आबा जाधव तसेच बँकेचे कर्मचारी सुनिल केसरकर,मिलींद प्रभावळकर आदी उपस्थित होते.*
Comments
Post a Comment