संकटकाळी धैर्य सोडू नका संघर्ष करा यश तुमचं आहे : आचार्य विशुद्ध सागर जी महाराज.

 संकटकाळी धैर्य सोडू नका संघर्ष करा यश तुमचं आहे : आचार्य विशुद्ध सागर जी महाराज.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-------------------------------

गांधीनगर:- मनुष्याने संकटकाळी धैर्य सोडू नये, जो धैर्य सोडून अधीर होतो. तो अडचणीत येतो. आणि जो संकटात सामना करतो त्याच्यावरील संकट दूर होते. जसा विचार तसा आचार, मन बदला जग बदलेल, मनातील भाव शुद्ध ठेवून जगायला शिका म्हणजेच पुण्याचा मार्ग स्वीकारा असे प्रतिपादन चर्या शिरोमणी आचार्य श्री 108 विशुद्ध सागरजी महाराज यांनी केले. ते वळीवडे (ता करवीर) येथील जैन मंदिरात आयोजित केलेल्या प्रवचनात बोलत होते.

आचार्य विशुद्ध सागरजी महाराज म्हणाले पाप आणि पुण्य याची पारख ठेवा, प्रत्येकात परमेश्वर आहे पण तो ओळखता आला पाहिजे त्यासाठी त्याग हा महत्त्वाच.

दरम्यान हेरले येथील पंचकल्याण महोत्सवाची सांगता करूण नांदणी येथे आयोजित असलेल्या चातुर्मास कार्यक्रमास प्रस्थान करण्यासाठी विशुद्ध सागरजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि श्रमण सुव्रतसागरजी मुनी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 28 मुनीश्री सहसंग यांचा विहार वळीवडे येथील दिगंबर जैन मंदिरात पार पडला. रविवारी सकाळी त्यांची पदयात्रा चिंचवाड, वसगडे, पट्टणकोडोली मार्गे पुढे नांदणी येथील चातुर्मास कार्यक्रमास प्रस्थान झाली. यावेळी वळिवडे, चिंचवाड, वसगडे, येथील समस्त दिगंबर जैन कमिटी, वीरसेवादल, वीर महिला मंडळ, श्रावक, श्राविका व गावातील भक्तगण मोठ्या संख्येने या प्रवचन तसेच प्रस्थान शोभयात्रेत सहभागी झाले होते.


फोटो ओळ: वळीवडे ता.करवीर येथील दिगंबर जैन मंदिरात भाविकांना उपदेश करताना चर्या शिरोमणी आचार्य श्री 108 विशुद्ध सागर जी महाराज व उपस्थित जनसमुदाय.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.