सातारा शहरातील कोडोली परिसरातील ०२ जणांवर सातारा पोलिसांनी केली मोका अंतर्गत कारवाई..दोघेही दोन वर्षाकरिता हद्दपार.

सातारा शहरातील कोडोली परिसरातील ०२ जणांवर सातारा पोलिसांनी केली मोका अंतर्गत कारवाई..दोघेही दोन वर्षाकरिता हद्दपार.

----------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा प्रतिनिधी

अमर इंदलकर 

----------------------------------------------------


      सातारा शहर परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०२ जणांच्या टोळीला सातारा पोलीसांनी दोन वर्षाकरीता केले तडीपार.

         याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या बऱ्याच दिवसांपासून इसम नामे १) निकेत वसंत पाटणकर वय २८ वर्षे रा. चंदननगर कोडोली सातारा २) आकाश उर्फ गुंड्या ज्ञानेश्वर कापले, वय २८ वर्षे रा. दत्तनगर कोडोली सातारा, या दोघांच्या टोळीने कोडोली परिसरात दहशत माजवली होती. यांचे टोळीवर सातारा शहर पोलीस ठाणेस खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, घरफोडी, चोरी, सरकारी नोकरास मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन मारहाण करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, शिवीगाळ दमदाटी करणे असे गंभीर गुन्हे दाखल असल्याने तसेच सदर टोळीच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसविण्यासाठी सातारा शहर पोलीस ठाणेचे तत्कालीन प्रभारी अधिकारी श्री. एम.जे. जगताप, पोलीस निरीक्षक, सातारा शहर पोलीस ठाणे यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी, श्री किरणकुमार सुर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती.

    सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. ते सातारा जिल्हयामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेचर कायद्याचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा शहर तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करणेची

मागणी होत होती.

        वरील टोळीस मा. समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर सुनावणी होवून त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्यये पुर्ण सातारा जिल्हयातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश

पारीत केला आहे.

      नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे २५ उपद्रवी टोळयांमधील ८१ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे २४ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण १०७ इसमांविरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असून भविष्यातही आगामी लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत. 

    या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्रेणी पोउनि तानाजी माने पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाणेचे पो. हया संदीप पवार, पोकों अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.