संत तुकाराम महाराज विद्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिवस साजरा.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
----------------------------------------
येथून जवळ असलेल्या संत तुकाराम महाराज विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कंकरवाडी येथे आज दिनांक 1मे 2024 वार बुधवारला महाराष्ट्र दिन व तसेच जागतिक कामगार दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य साहेबराव जाधव यांच्या उपस्थितीत तसेच संचालक सुनीलभाऊ ढेकळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य साहेबराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग 5वी ते 11वी पर्यंत विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल घोषित करण्यात आला. या प्रसंगी उजास प्रकल्प अंतर्गत शाळेतील मुलींना सॅनिटारी नॅपकिन वाटप करण्यात आले तसेच पीएम पोषण यजनेतर्गत वर्ग 5वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले .यावेळी शिक्षिका अश्विनी घिगे मॅडम,चाटसे मॅडम व तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गजानन सानप यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 Comments