Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विनोद दादा पार्टे यांचे मार्फत दुष्काळ ग्रस्त गावासाठी मोफत पाणी वाटप.

 विनोद दादा पार्टे यांचे मार्फत दुष्काळ ग्रस्त गावासाठी मोफत पाणी वाटप.

सविस्तर :- मेढा ता जावळी गोंदेमाळ गावचे सुपुत्र आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट चे प्रमुख विनोद दादा पार्टे यांनी आपल्या ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लावली आहेत आणि अनेक लोकहिताचे उपक्रम ते तालुक्यात राबवत असतात त्यातीलच एक उपक्रम म्हणजे या वर्षी उन्हाळा जास्त असल्याने तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाई आहे हे लक्षात घेऊन त्यांनी पाणी टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना मोफत पाणी वाटप सुरू केले आहे .प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात गुंग असल्याने जनतेकडे कोणाचे लक्ष नसल्याचे चित्र तालुक्यासह राज्यभर आहे मात्र कोणताही स्वार्थ न पाहता निस्वार्थी भावनेने लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट ने हाती घेतलेले काम पाहून अनेक गोरगरीब लोकाच्यामध्ये समाधानाच वातावरण तयार झाले आहे.तसेच अनेकांनी विनोद दादा च्या समाजकार्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.तसेच कोणाला पाण्याची आवश्यकता असल्यास ट्रस्ट शी संपर्क साधावा असे आवाहन विनोद दादा पार्टे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments