जल जीवन अभियान केंद्र शासनाच्या योजनेला विरोध केला म्हणून महिलांचं ठिया आंदोलन.

 जल जीवन अभियान केंद्र शासनाच्या योजनेला विरोध केला म्हणून महिलांचं ठिया आंदोलन.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

हुपरी प्रतिनिधी 

जितेंद्र जाधव

---------------------------

करवीर तालुक्यातील सांगवडे गावी केंद्र शासनाची जल जीवन अभियान योजना मंजूर झालेले आहे गावातील माळ भागांमध्ये योजनेच्या कामाला सुरुवात झालेले आहे बऱ्याच ठिकाणी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे पण मराठी शाळेसमोरील एका रस्त्याच्या वादामुळे या योजनेला विरोध होत आहे तरी त्या कॉलनीतील महिलांनी आज संध्याकाळी साडेपाच ते सात या वेळेत रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन केले ही योजना पंचगंगेच्या पाण्याची नाही आहे आमदार खासदारांच्या फंडातून या योजनेला मंजुरी मिळाली आहे वाद करा पण रस्त्यासाठी करा पाण्यासाठी नको बरेच ठिकाणी माळभागावर पाण्याची भरपूर टंचाई झालेली आहे बोरवेल ला पाणी कमी प्रमाणात येत आहे अनेकांच्या घरातील लोकांना पाण्याअभावी वन वन फिरावे लागते अनेक जण एक हजार लिटर पाणी 300 / 400 रुपये ला विकत घेत आहेत गावांमध्ये पण एक दिवस आड करून चावीला पाणी सोडलं जातं तरी ही योजना लवकरात लवकर पूर्ण करून सर्वांना पाणी मिळावे आणि सर्वांनी या योजनेला सहकार्य करावे असे लोकांच्यातून बोललं जात आहे पाणी म्हणजे जीवन आहे वाद रस्त्यासाठी करा पण पाण्यासाठी करू नका

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.