Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बांगला देशींचे मुरगूड कनेक्शन एकदा शोधाच.

 बांगला देशींचे मुरगूड कनेक्शन एकदा शोधाच.


----------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

----------------------------

    . बांगला देशींचे सांगली आणि कोल्हापूर कनेक्शन च्या ठळक बातम्या वृत्तपत्रातून वाचायला मिळाल्या.सुरक्षा यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली असा आक्षेप सुध्दा लावण्यात आला.

   मुरगूड मधले बांगला देशी कनेक्शन सुध्दा शोधलेच पाहिजे असा येथील तरुणाईचा आक्षेप आहे.त्यांना तसा संशय आलाय.शहरातील कांहीं ठिकाणे सुध्दा त्या तरुणांनी सांगितली आहेत.

  नगरपरिषद आणि पोलिस यांच्याकडे तक्रारी पण केल्या असे त्यांनी सांगितले .

 पण लक्षात कोण घेतो ?

    शहरात गांजा आणि अस्वच्छता यांचे प्रमाण पण वाढत आहे.त्यामध्ये राजस्थान ,बिहार ,पश्चिम.बंगाल चे ही कामगार आहेत.पोट भरायला आले असतील तर ठीक आहे.कष्ट करून खाऊ देत.

   त्यांचे गांजा बिंजा असले प्रकार मात्र या शहरात चालू देणार नाही तसेच दुसरे असे की यात जर कोणी बांगला देशी असतील तर तेही खपवून घेतले जाणार नाही कारण ते या देशाचे नागरिक नाहीत.हेरगिरी,अतिरेकी संघटनांशी असलेले लागेबांधे यामुळे असे बाहेरचे घुसखोर धोकादायक ठरतील.

     त्यांच्या कडे रेशन कार्ड ,पॅनकार्ड ,आधार कार्ड आले कोठून ?

  त्यांची नावे इथल्या मतदार यादीत तर नाहीत ना ? 

अशा शंका या तरुणांच्या मनात आल्या तर नवल नाही.

रोज नवीन चेहरे कोठून येतात?

बाजारातले नेहमीचे व्यापारी सुध्दा आता पाठ झालेत . 

या नव्यांचा शोध घ्यायलाच हवा.त्यांना मदत पुरविणाऱ्या सरकारी एजंटांचा सुध्दा शोध लागला पाहिजे.

    उद्या यांची लोकसंख्या वाढू लागली तर भारतीयांना हळू हळू हिंदी महासागराकडे सरकायला पाहिजे व जलसमाधी घ्यायला पाहिजे अशी भाकिते सुध्दा काहीं नी बोलून दाखवली

    स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय यंत्रणा यांनी याची दखल घेतली नाही तर तो ही.मार्ग अवलंबावा लागेल असे मत त्यांनी मांडले आहे.

   नगर परिषदे समोर शिवछत्रपती आहेत.

    I LOVE MURGUD 

असा लखाकता फलक आहे .

  आम्ही स्वच्छ ,सुंदर आणि स्वाभिमानी मुरगूड वर प्रेम करतो.

   पडद्याआडच्या बरबटलेल्या व्यसनाधीनता व घुसखोरीचा आम्हीं धिक्कार करतो अशी भूमिका या तरुणाईने घेतली आहे.

त्याची सुरुवात बांगला देशींचे मुरगूड कनेक्शन शोधून काढण्यापासून होईल.

Post a Comment

0 Comments