Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चिखली ते व्याड रस्ता तात्काळ डांबरीकरण करावा शेख तोसीफ यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.

 चिखली ते व्याड रस्ता तात्काळ डांबरीकरण करावा शेख तोसीफ यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन.  


  -----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड  प्रतिनिधी 

 रणजीत ठाकूर 

-----------------------------------

 तालुक्यातील रिसोड ते वाशिम रोडवर चिखली वरून व्याड मार्गे गोरेगाव हिंगोली जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे, या रस्त्यावर चिखलीचे ते व्याड या पाच किलोमीटर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे, सदर डांबरीकरण रस्ता हा गेल्या पाच वर्षांपूर्वी पासून पूर्णपणे उकडुन गेला असून या रस्त्याने मोठ मोठे खड्डे सुद्धा पडलेले आहेतः ,सदर नादुरुस्त रस्त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघातही झालेले आहेत ,या रस्त्याने चिखली ,रिसोड व वाशिम जाणाऱ्यांची तसेच हिंगोली गोरेगाव जाण्यासाठी सुद्धा हा अतिशय महत्त्वाचा रस्ता समजला जातो या रस्त्याने सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत शेकडे वाहने चालतात, मोटरसायकल पासून ते फोर व्हीलर व एसटी बसच्या अनेक फेऱ्या या रस्त्याने असून शाळेच्या स्कूलबस शाळकरी मुले मुली या रस्त्याने बरेच अशी वर्दळ असते, चिखली ते व्याडच्या मध्यभागी एक शाळा कॉलेज सुद्धा अस्तित्वात असून सदर रस्त्यावर चालताना नागरिकांना अतिशय कसरत करावी लागते ,सदर बाबीची दखल वंचित बहुजन युवा आघाडीचे शेख तोसीफ शेख हसन यांनी घेतली असून यांनी सदर निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग रिसोड यांना दिले सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी निवेदनातून केलेली आहे ,सदर रस्त्याने विद्यार्थीवृद्ध  दिव्यांग बांधव ,वयोवृद्ध व्यक्तींना तसेच शेतकरी वर्गांना शेतीचा माल रिसोड वाशिम मार्केटला आणण्यासाठी फार मोठे कसरत करावी लागत आहे ,या रस्त्याची अतिशय चाळणी चाळणी झाल्याने सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा आचारसंहितेनंतर या रस्त्यासाठी आंदोलन करणार असल्याचे शेख तोसीफ यांनी म्हटले आहे सदर निवेदनाची प्रशासनाने तात्काळ दाखल घ्यावी आणि या  रस्त्याने होणाऱ्या  अपघात टाळावे ,अन्यथा या सर्व बाबीस प्रशासन जबाबदार राहील असे शेख तोसीफ यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments