जल जीवन मिशनच्या पाईप लाईनचे काम सुरू.

 जल जीवन मिशनच्या पाईप लाईनचे काम सुरू.


------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर

------------------------------------

*गणेशपुर येथील काम प्रगती पथावर.* 

 तालुक्यातील अनेक गावातील जलजीवन मिशन योजनेची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. परिणामी पाणी टंचाईवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सुरू केलेल्या सदर योजनेच्या उद्देशालाच ' खो ' बसत आहे. या गंभीर प्रकाराबाबत जलजीवन मिशनला लेटलतिफीचे ग्रहण " या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनात खळबळ उडवून दिली होती. सदर बातमीची दाखल घेत अर्धवट अवस्थेत पडून असलेली कामे पुर्ण करण्यासाठी सुरुवात झाली असून गणेशपुर येथील पाईप लाईनचे काम जोमात सुरू आहे.  

     पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी शाश्वत पाणीपुरवठ्याची योजना म्हणुन " राष्ट्रीय जलजीवन मिशन " ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सन २०१६ मधे सूरू करण्यात आलेली योजना २०२४ पर्यंत पुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सदर योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध, पुरेसे, स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी कमी लोकसंख्या असलेल्या गावांना किमान एक कोटीच्या आसपास तर जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र सबंधित यंत्रणेच्या नियोजन शून्य कारभारामुळे अनेक ठिकाणच्या विहिरींची केलेली कामे व्यर्थ जाऊन परत दुसरीकडे नवीन विहीर खोदावी लागत आहे. तद्वतच काही ठिकाणी योजनेच्या जलकुंभाचे सांगाडे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. तर काही ठिकाणी विहीर, जलकुंभ पुर्ण झाले असले तरी पाईप लाईनचे काम होणे बाकी आहेत. परिणामी करोडो रुपये खर्ची घालून सुद्धा योजनेच्या मुळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे बातमी प्रकाशित करून उजागर केले होते. त्यामुळे संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची त्वरीत दखल घेत संनियंत्रण ठेवणारी यंत्रणा सज्ज केली आहे. परिणामी अनेक ठिकाणची अर्धवट कामे सुरू होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहेत.तर गणेशपुर येथील बाकी असलेले पाईप लाईनचे काम जोरात सुरू झाले आहे. गावकरी धन्यवाद देत आहेत. 


प्रतिक्रिया. 

" जलजीवन योजनेचे ईतर काही कामे पुर्ण झाली असली, तरी पाईप लाईनचे मुख्य काम थंडबस्त्यात पडले होते. ही बाब पेपरने अधोरेखित केल्यामुळे कामाला गती मिळाली आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी योजनेची बरीच कामे पुर्ण होतील अशी आशा आहे." 

      ____ शोभा जाधव.

( लोकनियुक्त सरपंच, गणेशपुर ता.रिसोड )

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.