Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नागाव येथे राजू शेट्टी यांचे जोरदार स्वागत.

 नागाव येथे राजू शेट्टी यांचे जोरदार स्वागत.

-----------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

-----------------------------------------

नागाव,ता.हातकणंगले येथे आज बुधवार 1 दि.1 मे रोजी सकाळी 9 वाजता लोकसभा निवडणुकीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ संपूर्ण गावातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी राजू शेट्टी व स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी बैलगाडीत उभारून आसूड ओढत पदयायात्रेत सहभाग घेतला.. ग्रामदैवत श्री खणाई देवी चे दर्शन घेऊन पद यात्रेला सुरुवात करण्यात आली.यावेळी समतानगर येथील विहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात  

 आले.त्याचबरोबर ठिकठिकाणी महिलांनी राजू शेट्टी याचे औक्षण केले.संपूर्ण गावातून फेरी मारून या फेरीची सांगता करणेत आली.

       या पदयात्रेत राजू शेट्टी यांनी गावातील विविध मान्यवरांच्या भेटी गाठी घेतल्या.

   यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नागाव चे नेते संघटक राहूल पाटील यांनी राजू शेट्टी यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.

देशभरामध्ये आज घडीला रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांच्या साठी लढा देणारा आणि धनदांडगे च्या मुजोरी ला न जुमानता स्वाभिमानी लढाई करणारा एकमेव नेता राजू शेट्टी हे असून त्यांना प्रचंड मतांनि विजयी करणेचे आव्हान प्रगतशील शेतकरी श्री उमेश सदाशिव भोसले यांनि केले 


   यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष आशानंद मिठारी,माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसो पाटील,वळीवडे चे कट्टर समर्थक राहूल दिगंबरे,प,प्रकाश पोवार,सुधीर शिराळे, आशुतोष पाटील निखिल जाधव अशोक सोळंकुरे,संभाजी रेवले,आनंदा बिडकर, आदिनाथ मगदूम,संतोष लंबे,निखिल जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments